इतिहासात प्रथमच कोलाऱ्यात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी घडवला आदर्श!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोलारा ग्रामपंचायतीत नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर कोलारा ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच संविधानाची शपथ घेऊन पदभार स्वीकारला. उपस्थित सर्वांना आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले. नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करून कोरोनाचा प्रतिबंध करण्याचे आवाहनही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोलारा ग्रामपंचायतीत नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर कोलारा ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच संविधानाची शपथ घेऊन पदभार स्वीकारला. उपस्थित सर्वांना आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या वतीने मास्कचे  वाटप करण्यात आले. नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करून कोरोनाचा प्रतिबंध करण्याचे आवाहनही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना करण्यात आले.

सर्व नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकाऱ्यांना पंचायत समिती सदस्य सौ. मनीषाताई  सपकाळ यांनी संविधानाची शपथ दिली. यावेळी सरपंच सौ. वनिता रामेश्वर सोळंकी,  उपसरपंच गौतम किसन मघाडे , ग्रामपंचायत सदस्य भिकाजी बाबुराव सोळुंकी, ज्ञानेश्वर देवराव सोळुंकी, गणेश भुजंगराव सोळुंकी, सौ. कुसुम सिद्धेश्वर सोळंकी, सौ. कावेरी हिम्मतराव सोळुंके, सौ. अनुसया विष्णू सोळंकी, सौ. यमुनाबाई सांडू सोळंकी, सौ. संगीताताई किशोर मंडलकर, सौ. पल्लवी  मिलिंद खंडारे यांनी पदभार स्वीकारून शपथ घेतली. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, साहेबराव पाटील सोळंकी, डॉ . दामोदर भवर, भिकाजी सोळंकी, भगवानराव सोळंकी, नामदेवराव सपकाळ, रुस्तुम गवई,  पंढरीनाथ सोळंकी, धोंडू पाटील, वसंतराव दुकानदार, सौ. शोभाताई सोळंकी, सौ. निकिता सोळंकी, कु. जया सोळंकी, गुलाबराव महाराज, डॉक्टर संतोष गवई आदींची उपस्‍थिती होती.