इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसचे माहेरघर ः श्रीरंग इलेक्ट्रॉनिक्स

लहानपणी कोणी पोलीस, लष्करी जवान वा अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. बुलडाण्यातील गौरव बबनराव राठोड यांनी मात्र यशस्वी व्यावसायिक होण्याचे खडतर स्वप्न पाहिले. तारुण्यातही ते त्यावर कायम राहिले आणि 22 व्या वर्षी त्यांनी ते पूर्ण देखील केले! आज शहरातील भरगर्दीच्या, मध्यवर्ती भागातील कारंजा चौक मार्गावरील श्री. राठोड यांचे श्रीरंग इलेक्ट्रॉनिक्स हे व्यावसायिक प्रतिष्ठान दिमाखात उभे आहे. …
 
इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसचे माहेरघर ः श्रीरंग इलेक्ट्रॉनिक्स

लहानपणी कोणी पोलीस, लष्करी जवान वा अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. बुलडाण्यातील गौरव बबनराव राठोड यांनी मात्र यशस्वी व्यावसायिक होण्याचे खडतर स्वप्न पाहिले. तारुण्यातही ते त्यावर कायम राहिले आणि 22 व्या वर्षी त्यांनी ते पूर्ण देखील केले!

इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसचे माहेरघर ः श्रीरंग इलेक्ट्रॉनिक्स

आज शहरातील भरगर्दीच्या, मध्यवर्ती भागातील कारंजा चौक मार्गावरील श्री. राठोड यांचे श्रीरंग इलेक्ट्रॉनिक्स हे व्यावसायिक प्रतिष्ठान दिमाखात उभे आहे. 17 ऑक्टोबर 2017 रोजी श्रीरंगचा शुभारंभ झाला आणि श्री. राठोड यांची स्वप्नपूर्तीदेखील झाली. या दुकानात ब्रँडेड कंपनीचे टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, पंखे, कुलर आदी सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे उपलब्ध आहेत. अल्पावधीतच गौरव यांनी ग्राहकी आणि ग्राहकांचा विश्‍वास प्राप्त केलाय. अर्थात हे इतक्या सहजासहजी घडले नाही. विशीतील गौरव यांना व्यावसायिक असलेले पिताश्री बबनराव राठोड यांचे स्ट्राँग मार्गदर्शन, पाठबळ मिळाले. त्यांच्या अनुभवाचा लाभ झाला. श्रीरंग इलेक्ट्रॉनिक्सच्या शाखा उघडण्यावर आपला भर राहणार असल्याचे बुलडाणा लाईव्हशी बोलताना गौरव राठोड यांनी सांगितले.