इलेक्शनमध्ये दारूची सोय… जलंब पोलिसांनी केली गैरसोय!

जलंब (संतोष देठे पाटील) ः ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री वाढली असून, या प्रकारांना थांबविण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. जिल्हाभर धडाकेबाज कारवाया सुरू असून, जलंब पोलिसांनीही 12 जानेवारच्या रात्री दोघांना पकडून त्यांच्या ताब्यातून देशीदारूच्या बाटल्यांसह 35 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष ठाणेदार पी. आर. इंगळे …
 

जलंब (संतोष देठे पाटील) ः ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अवैध दारू विक्री वाढली असून, या प्रकारांना थांबविण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे. जिल्हाभर धडाकेबाज कारवाया सुरू असून, जलंब पोलिसांनीही 12 जानेवारच्या रात्री दोघांना पकडून त्यांच्या ताब्यातून देशीदारूच्या बाटल्यांसह 35 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष ठाणेदार पी. आर. इंगळे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली.

जलंब पोलिसांना माहिती मिळाली की दादगाव रोडने अवैधरित्या दारू नेण्यात येणार आहे. या गोपनीय माहितीवरुन ठाणेदार श्री. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार पोहेवा देविदास चव्हाण, सुपडसींग चव्हाण, विजय यादगिरे, पो.काँ. संदीप गावंडे यांनी सापळा रचला. त्याचवेळी एका दुचाकीवर शिवदास हरी धुळे (25) व आकाश राजेंद्र धाडे (22, दोघेही रा. नरवेल ता. मलकापूर) हे दोघे अवैधरित्य देशीदारू नेताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून देशीदारूच्या दारूने भरलेल्या 296 बाँटल्स व वाहन असा एकूण 35212 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई अप्पर पोलीस हेमराजसिंह राजपूत व खामगाव उपविभागीय अधिकारी अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.