इलेक्शनमध्ये बनावट दारू….एलसीबीने उद्ध्वस्त केला बनावट दारूचा अड्डा!; मोताळा तालुक्यात कारवाई

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वरून दिसायला ब्रँडेड कंपनीची दारू दिसेल पण आतमध्ये काय? आतमध्ये असू शकते बनावट दारू…हो तसाच प्रकार जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यात समोर आला आहे. नकली दारू बनावटीचा धंदा बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. सुभाषसिंग दिवाण सिंग इंगळे (40, रा. तालखेड, ता. मोताळा) असे असे नकली दारू बनवणार्याचे …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वरून दिसायला ब्रँडेड कंपनीची दारू दिसेल पण आतमध्ये काय? आतमध्ये असू शकते बनावट दारू…हो तसाच प्रकार जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यात समोर आला आहे. नकली दारू बनावटीचा धंदा बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. सुभाषसिंग दिवाण सिंग इंगळे (40, रा. तालखेड, ता. मोताळा) असे असे नकली दारू बनवणार्‍याचे नाव असून, त्याचा अड्डा उद्ध्वस्त केला असला तरी, अंधाराचा फायदा घेत तो पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्याला जंगजंग पछाडले जात आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अवैध दारू विक्रीला ऊत आला असून, या पार्श्‍वभूमीवर पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. तालखेडा शिवारात नकली दारू बनवण्याचा धंदा सुरू असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यावरून एलसीबी पथकाने आज पहाटे दोनच्या दरम्यान तालखेड शेत शिवार गाठले. पोलिसांची चाहुल लागल्याने अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून 90 मि.ली.चे बनावट देशी दारूचे 24 नग बॉक्स, 90 मि.ली.च्या 162 रिकाम्या बाटल्या, 90 मि.ली. च्या 110 रसायन भरलेल्या बाटल्या, 80 लिटर रसायन, टॅगो पंच लिहिलेले रिंगचे 2000 झाकणे, बजाज पल्सर दुचाकी, बनावट लेबल असा एकूण 1,54,140 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ श्रीकृष्णा चांदुरकर, पो.ना. गजानन आहेरकर, पो.ना. लक्ष्मण कटक, पो.ना. राजेंद्र क्षीरसागर, पो.काँ. गजानन गोरले, पो.काँ.वैभव मगर, चालक एएसआय श्री. मिसाळ, चालक पो.ना. विजय मुंढे यांच्या पथकाने पार पाडली.