ई -पीक पाहणी; आंतरपिकांची नोंद करताना शेतकरी परेशान!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सातबाऱ्यावर पिकांची नोंद करण्याचे काम आतापर्यंत तलाठी करत होते. यावर्षीपासून ई- पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनीच स्वतःच्या पिकांची नोंद स्वतः करावी, असा नियम सरकारने काढला आहे. सरकारच्या या उपक्रमाचे मात्र तीन-तेरा वाजल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. आतापर्यंत केवळ ३५ टक्के शेतकऱ्यांनीच पिकांची नोंद केली आहे. पिकांची नोंद करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा …
 
ई -पीक पाहणी; आंतरपिकांची नोंद करताना शेतकरी परेशान!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सातबाऱ्यावर पिकांची नोंद करण्याचे काम आतापर्यंत तलाठी करत होते. यावर्षीपासून ई- पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनीच स्वतःच्या पिकांची नोंद स्वतः करावी, असा नियम सरकारने काढला आहे. सरकारच्या या उपक्रमाचे मात्र तीन-तेरा वाजल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

आतापर्यंत केवळ ३५ टक्के शेतकऱ्यांनीच पिकांची नोंद केली आहे. पिकांची नोंद करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ही पद्धत नको रे बाबा, असाच सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे. मोठा गाजा-वाजा करून सरकारने हा उपक्रम सुरू केला असला तरी जिल्ह्यात मात्र याबद्दल फारशी जनजागृती झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना याबद्दल तोकडी माहिती आहे.

शेत शिवारात इंटरनेटची अनुपलब्धता, ॲप चालत नसणे अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत. याशिवाय पिकांची नोंदणी करत असताना आंतरपिकांची नोंद होत नसल्याने शेतकरी परेशान आहेत. शेतकरी सोयाबीन सारख्या मुख्य पिकात तूर, उडीद, मूग, भुईमूगाची लागवड करतात. मात्र या आंतरपिकांची नोंदच ॲपमध्ये होत नाही. त्यामुळे सातबाऱ्यावर पिकाची नोंद होत नाही.

ई पीक पाहणी ॲपमध्ये आंतरपिकांची नोंद घेण्यासाठी सर्वच पर्याय निवडून बघितले तरी नोंद झाली नाही. ॲप नीट चालत नाही. त्यामुळे आमची पंचाईत झाली.

– शिवाजी वाघ, शेतकरी, शेलगाव आटोळ