उंट बिडी म्‍हणून विकायचा नकली बिडी!; मलकापुरात रामचंद्र ट्रेडर्सवर छापा, व्‍यापाऱ्याला अटक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः उंट बिडी कंपनीच्या नावाची नक्कल करून बनावट बिडीची विक्री करणाऱ्या मलकापुरातील एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अमर रामचंद्र तलरेजा असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. मलकापूर शहरात बनावट उंट बिडी विकली जात असल्याची माहिती उंट बिडी उत्पादक कंपनीला मिळाली होती. या बाबतची शहनिशा केल्यानंतर उंट बिडीचे सर्व्हेअर अमोल कुलकर्णी यांनी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः उंट बिडी कंपनीच्या नावाची नक्कल करून बनावट बिडीची विक्री करणाऱ्या मलकापुरातील एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अमर रामचंद्र तलरेजा असे या व्यापाऱ्याचे नाव आहे.

मलकापूर शहरात बनावट उंट बिडी विकली जात असल्याची माहिती उंट बिडी उत्पादक कंपनीला मिळाली होती. या बाबतची शहनिशा केल्यानंतर उंट बिडीचे सर्व्हेअर अमोल कुलकर्णी यांनी याची तक्रार मलकापूर शहर पोलसांत दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून काल, 12 मार्चला मलकापूर शहरातील रामचंद्र ट्रेडर्सवर छापा मारला. दुकानातून उंट बिडी या प्रचलित कंपनीच्या नावाचा बनावट साठा किंमत 12 हजार रुपये जप्त करण्यात आला. आरोपी अमर रामचंद्र तलरेजा याच्‍या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्‍याला अटक करण्यात आली आहे.