उच्चशिक्षित बंधूंचे उच्च दर्जाचे पंजाब कलेक्शन्स

एखाद्या मित्र वा सहकार्याप्रमाणे एकत्र बालपणाचा आनंद घेणारे त्या बंधूंच्या उचशिक्षणातही समानता आहे. त्यांची समानता, आदर्श जोडी व्यवसायातही कायमच आहे. त्यामुळे व वडीलधार्यांच्या आशीर्वादरूपी पाठबळाने ते आज शहरातील एका मोठ्या दालनाचे यशस्वीरित्या संचलन करत आहेत… या बंधूंचे नाव आहे, कृष्णा खुराणा व गोपाला खुराणा. अनुक्रमे 35 व 25 वर्षे असे त्यांचे वय. दोघांनी व्यवसायात उच्च …
 
उच्चशिक्षित बंधूंचे उच्च दर्जाचे पंजाब कलेक्शन्स

एखाद्या मित्र वा सहकार्‍याप्रमाणे एकत्र बालपणाचा आनंद घेणारे त्या बंधूंच्या उचशिक्षणातही समानता आहे. त्यांची समानता, आदर्श जोडी व्यवसायातही कायमच आहे. त्यामुळे व वडीलधार्‍यांच्या आशीर्वादरूपी पाठबळाने ते आज शहरातील एका मोठ्या दालनाचे यशस्वीरित्या संचलन करत आहेत… या बंधूंचे नाव आहे, कृष्णा खुराणा व गोपाला खुराणा. अनुक्रमे 35 व 25 वर्षे असे त्यांचे वय.

उच्चशिक्षित बंधूंचे उच्च दर्जाचे पंजाब कलेक्शन्स

दोघांनी व्यवसायात उच्च शिक्षण घेतले असून, ते एमबीए आहेत. तसं त्यांच्या रक्तातच व्यवसाय भिनलेला आहे. त्यांचे पिताश्री मोहन खुराणा व काका नारायण खुराणा हे देखील यशस्वी व्यावसायिक. त्यांच्या मार्गदर्शनात ते पंजाब कलेक्शन्स या रेडिमेड कपड्यांचे शोरूम वजा प्रतिष्ठानचे संचालक आहेत. मेन्स वेअर, साड्या, सुटिंग- शर्टिंग, लेडीज वेअर आणि नामांकित कंपन्यांची सर्व उत्पादने त्यांच्या जनता चौकातील आर. बी. हाऊसमध्ये उपलब्ध आहेत. एकाच छताखाली सर्व वस्त्रांचे हे दालन ग्राहकांचे आवडते खरेदीचे ठिकाण, उत्कृष्ठ लोकांसाठी उत्कृष्ठ कपडे हेच आपले ध्येय असल्याचे या कृष्णा व गोपाला या बंधूंनी सांगितले.

उच्चशिक्षित बंधूंचे उच्च दर्जाचे पंजाब कलेक्शन्स

नवीन फॅशनचे कपडे लवकरात लवकर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणे व माफक दरात देणे हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना सांगितले. आपल्या दुकानाचा उद्घाटन सोहळा सिने अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या हस्ते 1 ऑक्टोबर 2016 रोजी पार पडला, तो आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग ठरल्याचे त्यांनी सांगितले. नोटबंदी, कोरोना हे व्यवसायातील मोठ्या अडचणी ठरल्या असे सांगून व्यापार्‍यांसाठी कायदे सुटसुटीत असावेत, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली. जीएसटी आणि कराचा भरणा त्रैमासिक असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. तत्व, व्यवसायाशी एकनिष्ठ राहिले, प्रामाणिकपणे धंदा केला तर तुम्हाला 100 टक्के यश मिळणार, असेही या बंधूंनी चर्चेअंती सांगितले.