उत्तररात्री रंगला होता त्‍यांचा खेळ, पोलिसांनी केला बेरंग..!; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः किराणा दुकानासमोर उत्तररात्री रंगलेल्या जुगाराच्या खेळावर खामगाव शहर पोलिसांनी छापा मारून तिघांना पकडले. चौघे पळून जाण्यात यशस्वी झाले. ही कारवाई जयपूर लांडे (ता. खामगाव) येथील नीलेश दामोदर लांडे याच्या किराणा दुकानासमोर काल, 20 एप्रिलला सव्वा अकराच्या सुमारास करण्यात आली. पोलीस उपनिरिक्षक रणजितसिंग ठाकूर यांच्यासह सहकाऱ्यांनी ही कारवाई …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः किराणा दुकानासमोर उत्तररात्री रंगलेल्या जुगाराच्‍या खेळावर खामगाव शहर पोलिसांनी छापा मारून तिघांना पकडले. चौघे पळून जाण्यात यशस्वी झाले. ही कारवाई जयपूर लांडे (ता. खामगाव) येथील नीलेश दामोदर लांडे याच्या किराणा दुकानासमोर काल,  20 एप्रिलला सव्वा अकराच्‍या सुमारास करण्यात आली.

पोलीस उपनिरिक्षक रणजितसिंग ठाकूर यांच्यासह सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. नीलेश लांडे (32), विकास दामोदर लांडे (22), नारायण पांडुरंग लांडे (40), विक्की उदयभान तायडे, सोनू कैलाससिंग पवार, प्रविण तपाजी तायडे, संभाजी रामेश्वर तायडे (सर्व रा. जयपूर लांडे) अशी गुन्‍हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारला असता नीलेशच्‍या किराणा दुकानासमोर ही सर्व मंडळी एक्का बादशहा नावाचा जुगार पैशाच्या हारजीतवर खेळत होती. त्यातील नीलेश, विकास व नारायणला जागीच पकडण्यात आले तर  पांडुरंग, विक्की, सोनू, प्रवीण, संभाजी हे पळून गेले. नीलेशकडून नगदी 450 रुपये, विकासकडून 300 रुपये, नारायणकडून 250 रुपये व डावावर लावलेले 640 रुपये, 52 ताशपत्ते (किंमत 20 रुपये), 1 सॅमसंग कंपनीचा मोबाइल 5 हजार रुपयांचा एकूण 6 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.