उत्‍कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केला सन्मान

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोन्याच्या गिन्न्या स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना बोलवायचे आणि गिन्न्या न देताच मारहाण करून पैसे लुटण्याच्या घटना खामगाव ग्रामीण आणि हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढल्या होत्या. वाढत्या घटनांमुळे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मेच्या पहाटे विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवून 25 जणांना अटक करण्यात आली होती. घातक शस्त्रांसह …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सोन्‍याच्‍या गिन्न्या स्‍वस्‍तात देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना बोलवायचे आणि गिन्न्या न देताच मारहाण करून पैसे लुटण्याच्‍या घटना खामगाव ग्रामीण आणि हिवरखेड पोलीस ठाण्याच्‍या हद्दीत वाढल्‍या होत्या. वाढत्‍या घटनांमुळे कर्तव्‍यदक्ष पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्‍या मार्गदर्शनाखाली 6 मेच्या पहाटे विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवून 25 जणांना अटक करण्यात आली होती. घातक शस्‍त्रांसह नगदी 26 लाख रुपये असा 31 लाख 79 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. ही मोहीम यशस्वी करणाऱ्या पोलिसांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सन्मान केला आहे.

हे आहेत सत्काराचे मानकरी
अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर, खामगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रफिक शेख, शेगाव शहरचे पोलीस निरीक्षक संतोष ताले, शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सुनील हुड, हिवरखेडचे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण तळी, पिंपळगाव राजाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, शेगाव ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी, खामगाव ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक द्वारकानाथ गोंदगे, शेगाव शहरचे सहायक पोलीस निरीक्षक गौतम इंगळे, खामगाव शहरचे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश सरदार, सहायक पोलीस निरीक्षक गौतम सराग, पिंपळगाव राजा ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक योगेश धोत्रे, खामगाव शहर ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक रणजीतसिंह ठाकूर व ईश्वर सोळंके, अप्पर पोलीस अधीक्षकांचे वाचक पोलीस उपनिरिक्षक चंद्रकांत बोरसे, शिवाजीनगर ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक रत्‍नदीप पळसपगारे व संजय अवचिते.