उदावंत दाम्‍पत्‍याच्‍या हस्‍ते झाली वैष्णव गडावर विठ्ठल-रुख्माईची महापूजा

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वैष्णव गड (ता. सिंदखेड राजा) येथे कोरोनाविषयक नियम पाळून हभप सानप गुरुजी यांच्या उपस्थितीत दुसरबीड येथील वसंतराव नारायणराव उदावंत व सौ. अनिता वसंतराव उदावंत या दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठल-रुख्माईचा अभिषेक व महापूजा आज, २० जुलैला पहाटे चारच्या सुमारास करण्यात आली. मंदिर अगदी मनमोहक फुलांनी सजवून विद्युतरोषणाई करून …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वैष्णव गड (ता. सिंदखेड राजा) येथे कोरोनाविषयक नियम पाळून हभप सानप गुरुजी यांच्या उपस्थितीत दुसरबीड येथील वसंतराव नारायणराव उदावंत व सौ. अनिता वसंतराव उदावंत या दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठल-रुख्माईचा अभिषेक व महापूजा आज, २० जुलैला पहाटे चारच्‍या सुमारास करण्यात आली.

मंदिर अगदी मनमोहक फुलांनी सजवून विद्युतरोषणाई करून मंदिराची शोभा वाढविण्यात आली आहे. निर्बंध असल्यामुळे विठ्ठल भक्तांना दर्शनापासून मात्र वंचित राहावे लागले. गर्दी होऊ नये म्‍हणून सिंदखेड राजाचे पोलीस निरीक्षक श्री. पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मध्यरात्रीपासून चोख बंदोबस्त ठेवलेला होता. महापूजेवेळी सुरेश कुलथे, ज्ञानेश्वर कुलथे, पंढरीनाथ घुगे, हभप नाना महाराज पोखरीकर, श्रीनिवास पोखरीकर, सखाराम बुरकुल, केशव घुगे, प्रल्हाद केदार, प्रल्हाद घुगे, सुखदेव ताटे, बबनराव नारायणराव उदावंत, ज्योती बबनराव उदावंत, हभप रमेश महाराज जायभाये, श्री. नागरे यांची उपस्‍थिती होती.