उद्धव ठाकरे देशात लयभारी!

मुंबई ः कोणत्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली, कोणत्या वाईट यावर झालेल्या सर्वेक्षणात देशभरातील नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वांत चांगले मुख्यमंत्री असण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.विरोधक जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारवर टीका करीत असले, तरी जनता मात्र त्यांच्या कामावर खूश आहे. कोरोना परिस्थितीची हाताळणी आणि अन्य कामांवर जनता फिदा आहे. लोकप्रिय मुख्यमंत्री कोण यावर …
 

मुंबई ः कोणत्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी चांगली, कोणत्या वाईट यावर झालेल्या सर्वेक्षणात देशभरातील नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वांत चांगले मुख्यमंत्री असण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
विरोधक जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्य सरकारवर टीका करीत असले, तरी जनता मात्र त्यांच्या कामावर खूश आहे. कोरोना परिस्थितीची हाताळणी आणि अन्य कामांवर जनता फिदा आहे. लोकप्रिय मुख्यमंत्री कोण यावर उत्तर देताना सर्वाधिक मते ठाकरे यांना मिळाली आहेत. जवळपास 49 टक्के मतदारांनी ठाकरे यांची कामगिरी चांगली असल्याचं आणि त्यांना पुन्हा मतदान करू असं म्हटलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना 44 टक्के मते मिळाली असून ते दुसऱ्या स्थानी, तर तिसऱ्या स्थानी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आहेत. सर्वाधिक अप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे पहिल्या क्रमांकावर आहेत. 60 टक्के मतदारांना त्यांची कामगिरी पसंत नाही. उत्तराखंडमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांकडं राज्याची सूत्रे सोपवली असली, तरी तिथल्या आधीच्या नेतृत्वाबाबत 80 मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्तराखंड आणि पंजाबनंतर गुजरातचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये विजय रुपानी मुख्यमंत्री आहेत. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पाचव्या स्थानी आहेत. उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, गुजरात या राज्यांमध्ये पुढच्यावर्षी विधानसभा निवडणुका आहेत.