उद्यापासून 24 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; शेतकऱ्यांनो काळजी घ्या

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात उद्या, 21 एप्रिलपासून पुढील 4 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची व हलक्या ते मध्यम पावसाची श्यक्यता वर्तविण्यात आली आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने हा अंदाज वर्तविला आहे. पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी कापणी, मळणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवण्याची व्यवस्था करावी. साठवणुकीची व्यवस्था नसल्यास संबंधित शेतमाल प्लास्टिक शीटने …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  जिल्ह्यात उद्या, 21 एप्रिलपासून पुढील 4 दिवस  तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची व हलक्या ते मध्यम पावसाची श्यक्यता वर्तविण्यात आली आहे.  नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने हा अंदाज  वर्तविला आहे.

पावसाची  शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी कापणी, मळणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवण्याची व्यवस्था करावी. साठवणुकीची व्यवस्था नसल्यास संबंधित शेतमाल प्लास्टिक शीटने झाकून ठेवावा. फळझाडांना बांबूंचा आधार द्यावा. विजांचा कडकडाट होणार असल्याने विजा चमकत असताना शेतकऱ्यांनी झाडाखाली उभे राहू नये. स्वतःची व जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र व कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा यांनी केले आहे.