उपोषणांनी गजबजला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर; एका उपोषणकर्तीची प्रकृती चिंताजनक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आंदोलकांनी दणाणून सोडला. स्वातंत्र्य दिनापासून उपोषण आणि आंदोलने सुरू आहेत. परिसर उपोषण मंडपांनी गजबजलेला आहे. विविध संस्था, संघटना आणि नागरिकांची ही आंदोलने आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवा; गोर सेनेचे साखळी उपोषणस्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य …
 
उपोषणांनी गजबजला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर; एका उपोषणकर्तीची प्रकृती चिंताजनक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आंदोलकांनी दणाणून सोडला. स्वातंत्र्य दिनापासून उपोषण आणि आंदोलने सुरू आहेत. परिसर उपोषण मंडपांनी गजबजलेला आहे. विविध संस्था, संघटना आणि नागरिकांची ही आंदोलने आहेत.

ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवा; गोर सेनेचे साखळी उपोषण
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने तात्काळ कार्यवाही करावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी गोर सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.आज १८ ऑगस्ट रोजी उपोषणाचा दुसरा दिवस आहे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी. नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे. मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे. एमपीएससीच्या संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे. महाज्योतीला ३००० रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा या मागण्यांसह इतर मागण्या गोर सेनेने केल्या आहेत. गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद राठोड, मोताळा तालुका उपाध्यक्ष सौरभ चव्हाण, विशाल राठोड, अमर राठोड, गजानन राठोड, दिलीप राठोड, वसंत जाधव, रवींद्र जाधव, रवींद्र चव्हाण, सागर चव्हाण, संदीप चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत.

उपोषणांनी गजबजला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर; एका उपोषणकर्तीची प्रकृती चिंताजनक

शेतरस्त्यासाठी मोताळा तालुक्यातील शेतकरी दाम्पत्याचे उपोषण
अवैध गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्यांनी शेतात रस्ता तयार केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्‍या जमिनीचे नुकसान झाले. त्यामुळे तयार केलेला रस्ता मोकळा करून घ्यावा व नावावर असलेली ३ एकर शेती मोजून ताब्यात द्यावी या मागणीसाठी कोथळी (ता. मोताळा) येथील शेतकरी विनोद भीमराव धुरंदर व त्यांची पत्नी १५ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहेत.

उपोषणांनी गजबजला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर; एका उपोषणकर्तीची प्रकृती चिंताजनक

साखरखेर्डा येथील महिलांचे उपोषण; एकीची प्रकृती चिंताजनक
लोकसंचालित साधन केंद्र साखरखेर्डा या संस्थेतील आर्थिक गैरव्यवहार व कथित कर्मचाऱ्यांची चौकशी करून कार्यवाही करावी या मागणीसाठी संस्थेच्या अध्यक्षांसह महिला सदस्या उपोषणाला बसल्या आहेत. आज १८ ऑगस्ट रोजी उपोषणाचा चौथा दिवस असून, उपोषणाला बसलेल्यांपैकी सुनीता रामेश्वर या महिलेची प्रकृती बिघडली आहे. रंजना भास्कर गारोळे, रत्नमाला रामदास मोरे, पंचफुला जगन्नाथ तुपकर, चंद्रकोर दिगंबर गवई, सुनीता नरेंद्र सरकटे, प्रमिला भीमराव गवई, मंदोदरी देविदास जाधव, सरस्वती नारायण गावडे या उपोषणाला बसल्या आहेत.

कर्जासाठी युवकाला ठेवले झुलवत; त्रस्त युवकाचे उपोषण
स्टेट बँक देऊळगाव मही शाखेकडून तीन वर्षे लोटल्यानंतरही युवकाला अण्णासाहेब पाटील महामंडळाचे १० लाखांचे कर्ज व्याज परतावा मिळण्याच्या आशेवर युवकाला झुलवत ठेवल्याने कंटाळून त्रस्त युवकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसला आहे. स्टेट बँकचे शाखा देऊळगाव महीचे व्यवस्थापक व बुलडाण्याचे लोन अधिकारी यांनी माझ्याकडून वारंवार वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता करुन घेतली. हे करत असताना यामध्ये माझा मानसिक व आर्थिक व शारीरिक छळ झाला असून बँक आता वेळकाढूपणा करून कार्यक्षेत्र नसल्याचे सांगत आहे. तसे असेल तर तीन वर्षे माझ्याकडून कागदपत्रे सादर करून का घेतली? ज्या संबंधित अधिकाऱ्यानी दिशाभूल केली. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी उपोषणकर्ते ज्ञानेश्वर म्हस्के यांनी केली आहे.

उपोषणांनी गजबजला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर; एका उपोषणकर्तीची प्रकृती चिंताजनक