उभ्या ट्रॅक्‍टर-ट्रॉलीला 2 मोटारसायकली धडकल्या; 1 महिला जागीच ठार, 3 युवक गंभीर जखमी, मेहकर तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ःबुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पंक्चर झाल्याने उभ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला 2 मोटारसायकली धडकून 1 महिला जागीच ठार तर 3 युवक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना चिखली-मेहकर रोडवरील पिंपळगाव उंडा येथे काल, 19 मार्चच्या रात्री 8 च्या सुमारास घडली. जखमींवर मेहकरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुनिता विठ्ठल राऊत (40, रा. द्वारकानगर बुलडाणा) …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ःबुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पंक्‍चर झाल्याने उभ्या ट्रॅक्‍टरच्‍या ट्रॉलीला 2 मोटारसायकली धडकून 1 महिला जागीच ठार तर 3 युवक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना चिखली-मेहकर रोडवरील पिंपळगाव उंडा येथे काल, 19 मार्चच्‍या रात्री 8 च्‍या सुमारास घडली. जखमींवर मेहकरच्‍या खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत.

सुनिता विठ्ठल राऊत (40, रा. द्वारकानगर बुलडाणा) असे झालेल्या महिलेचे नाव आहे. त्‍यांच्‍यासोबतचे अजय विठ्ठल राऊत (21, रा. द्वारकानगर, बुलडाणा) आणि सौरथ एकनाथ वाघ (17, रा. पवनसुतनगर, मेहकर) गंभीर जखमी झाले आहेत, दुसऱ्या मोटारसायकलवरील शुभम दिनेश अंभोरे (20, रा. पिंपळगाव उंडा, ता. मेहकर) हाही गंभीर जखमी आहे. ट्रॉलीला रिफ्लेक्‍टर नसल्याने हा अपघात घडला. वादळीवाऱ्यासह पाऊस सुरू होता. त्‍यामुळे ट्रॉली दिसून आली नाही आणि दोन्‍ही मोटारसायकली ट्रॉलीवर जाऊन आदळल्‍या. तपास साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे पोहेकाँ दिनेश चव्‍हाण करत आहेत.