उमाळा, खैरव गाव कंटेन्मेंट झोन घोषित! 75 गावकरी निघाले कोरोनाग्रस्त!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट नजीकच्या उमाळा आणि सिंदखेड राजा तालुक्यातील खैरव गावात कोरोनाचा उद्रेक झाल्याने संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. दोन्ही गावांमिळून तब्बल 75 गावकरी कोरोनाग्रस्त आढळल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी उमाळा गावातील 4 कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. यामुळे आरोग्य विभागातर्फे …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट नजीकच्‍या उमाळा आणि सिंदखेड राजा तालुक्‍यातील खैरव गावात कोरोनाचा उद्रेक झाल्याने संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. दोन्‍ही गावांमिळून तब्‍बल 75 गावकरी कोरोनाग्रस्‍त आढळल्‍याने खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी उमाळा गावातील 4 कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. यामुळे आरोग्य विभागातर्फे गावात कोरोनाविषयक तपासणी शिबिर घेण्यात आले. 211 गावकऱ्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असता आज 20 जण कोरोनाबाधित आढळले. काल 20 एप्रिलला 19 गावकरी पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे 2 दिवसांतच 39 व्यक्‍ती बाधित असल्याने संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन( प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले. यासंदर्भात संपर्क केला असता बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांनी याला दुजोरा दिला. दक्षतेचा उपाय म्हणून गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले. गावात आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले असून घरोघरी जाऊन नागरिकांचे तापमान, पल्स रेट व शरीरातील ऑक्सिजन पातळी तपासण्यात येत असल्याचे खंडारे यांनी स्पष्ट केले.

सिंदखेडराजा : खैरवमध्ये आढळले 36 रुग्‍ण

खैरव गावात कोरोनाचा विस्फोट झाल्‍यागत स्‍थिती आहे. अवघ्या अठराशे लोकवस्तीच्या या गावात कोरोनाचे 36 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजरत्‍न आठवले, पोकाँ कैलास उगले , आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात जाऊन पाहणी केली. गावाला कंटेनमेन्ट झोन  घोषित करण्यात आले. नागरिकांना सूचना देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.