उमेदवारांनो खर्च सादर करा अन्यथा…

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील एकूण 48 ग्रामपंचायतीचीं निवडणूक झाली आहे. नियमानुसार निवडणुकीत उभ्या उमेदवारांना खर्चाचा हिशोब मतमोजणीच्या 30 दिवसांच्या आत तहसील कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. मात्र अजूनही बर्याच उमेदवारांनी खर्चाचा हिशोब तहसील कार्यालयात सादर केलेला नाही. खर्चाचा हिशोब वेळेत सादर केला नाहीतर नियमानुसार कार्यवाही केली जाईल, असा इशाराच …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील एकूण 48 ग्रामपंचायतीचीं निवडणूक झाली आहे. नियमानुसार निवडणुकीत उभ्या उमेदवारांना खर्चाचा हिशोब मतमोजणीच्या 30 दिवसांच्या आत तहसील कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. मात्र अजूनही बर्‍याच उमेदवारांनी खर्चाचा हिशोब तहसील कार्यालयात सादर केलेला नाही. खर्चाचा हिशोब वेळेत सादर केला नाहीतर नियमानुसार कार्यवाही केली जाईल, असा इशाराच तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी राहुल तायडे, नायब तहसीलदार संजय मार्कड, आर. आर. बोदडे यांनी बुलडाणा लाईव्हद्वारे दिला आहे.