उसनवारीवरून लोखंडी पाईपने बेदम मारहाण; युवक जखमी

खामगाव (भागवत राऊत) ः उसनवारीवरून लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यात आल्याने 39 वर्षीय युवक जखमी झाला आहे. ही घटना खामगाव तालुक्यातील प्रिंपाळा येथे काल, 26 जानेवारीला संध्याकाळी घडली.संतोष हरिदास पेसोडे (रा. पिंप्राळा, ता. खामगाव) असे जखमीचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणार्या राहुल श्रीनाथ पांडे (रा. पिंप्राळा, ह.मु. माखरियानगर, खामगाव) याच्याविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी …
 

खामगाव (भागवत राऊत) ः उसनवारीवरून लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्यात आल्याने 39 वर्षीय युवक जखमी झाला आहे. ही घटना खामगाव तालुक्यातील प्रिंपाळा येथे काल, 26 जानेवारीला संध्याकाळी घडली.
संतोष हरिदास पेसोडे (रा. पिंप्राळा, ता. खामगाव) असे जखमीचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणार्‍या राहुल श्रीनाथ पांडे (रा. पिंप्राळा, ह.मु. माखरियानगर, खामगाव) याच्याविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर राहुलचा ढाबा आहे. ज्ञानेश्‍वरला त्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. यात ज्ञानेश्‍वरच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. तपास एएसआय शेख रब्बानी करत आहेत.