ऊर्जामंत्री नितीन राऊत अडचणीत; खासगी कामासाठी प्रवास करून बिले महावितरणला!

मुंबई ः राज्यात तीन पक्षांचे सरकार असताना सहकारी मंत्र्यांविरोधात तसेच सरकारविरोधात भूमिका घेऊन वाद निर्माण करणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत आता उच्च न्यायालयाच्या आदेशाने अडचणीत आले आहेत. टाळेबंदीच्या काळात खासगी कामासाठी प्रवास करून बिले मात्र वीज कंपन्यांना भरायला भाग पाडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राऊत यांनी खासगी कामासाठी विमान प्रवास केला व त्याचा खर्च वीज कंपन्यांना भरण्यास …
 

मुंबई ः राज्यात तीन पक्षांचे सरकार असताना सहकारी मंत्र्यांविरोधात तसेच सरकारविरोधात भूमिका घेऊन वाद निर्माण करणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत आता उच्च न्यायालयाच्या आदेशाने अडचणीत आले आहेत. टाळेबंदीच्या काळात खासगी कामासाठी प्रवास करून बिले मात्र वीज कंपन्यांना भरायला भाग पाडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

राऊत यांनी खासगी कामासाठी विमान प्रवास केला व त्याचा खर्च वीज कंपन्यांना भरण्यास भाग पाडले, असा आरोप करणारी जनहित याचिका भारतीय जनता पक्षाच्या माध्यम कक्षाचे प्रमुख विश्वास पाठक यांनी दाखल केली होती. त्‍यावर उत्तर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राऊत यांना दिले आहेत. राऊत यांच्या बेकायदा चार्टर्ड प्रवासावर करण्यात आलेला बेकायदा खर्च वसूल करण्याचे आदेश महावितरण, महाजनको, महाट्रान्स्को आदी कंपन्यांना द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर पुढील सुनावणी २८ जुलैला होणार असून तोपर्यंत उत्तर देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राऊत यांना दिला आहे.