एकनाथ खडसेंवरील कारवाईच्‍या निषेधार्थ मलकापुरात मोर्चा

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनाही अटक झाली आहे. जाणूनबुजून खडसेंच्या विरोधात “ईडी’ लावल्याचा आरोप करत मलकापूमध्ये महाविकास आघाडी, भ्रातृमंडळ सकल बहुजन समाज यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. त्‍यांचे जावई गिरीश चौधरी यांनाही अटक झाली आहे. जाणूनबुजून खडसेंच्‍या विरोधात “ईडी’ लावल्याचा आरोप करत मलकापूमध्ये महाविकास आघाडी, भ्रातृमंडळ सकल बहुजन समाज यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. चौकशी सूडबुद्धीने सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

केंद्र सरकारने हा प्रकार थांबवला नाही तर आगामी काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी
आमदार राजेश एकडे, डॉ. अरविंद कोलते, माजी आमदार वसंतराव शिंदे, ॲड. साहेबराव मोरे, सोपानराव शेलकर, किशोर नवले , बंडू चौधरी, अजय टप, शरद पाचपांडे, अनिल भारंबे, संजय नारखेडे, सुधाकर बोरसे, अनिल झोपे, दिलीप नाफडे, हाजी रशीद खा जमादार, ज्ञानदेव कोलते, अरुण अग्रवाल, नंदूसिंग राजपूत, आप्पा शेठ पाटील, गजू डवले, राजू जवरे, बंडू चवरे, ज्ञानदेव ढगे, तुषार पाटील, सचिन पाटील, छगन चौधरी, उमाकांत चौधरी, कृष्णा पाटील, संजय नारखेडे, शरद पाचपांडे, अनिल भारंबे, एस. एम. बोरले, डॉ. सलीम कुरेशी,दिलीप गोळीवाले, जयेश पाटील, अनिल रायपुरे, नीलेश पाटील, सुधाकर पाचपोळ, शरद मोरे, सुरेश पाटील, बाळू पाटील, रफीक खां, गिरीश कोलते, उमेश हिरुळकर, चेतन जगताप, ज्ञानदेव तायडे, बबन तायडे, समाधान इंगळे , शुभम लाहुडकर, उखर्डा तांदूळकर, निवृत्ती तांबे , तुषार साबळे, राजू राऊत, निलेश बोरसे, विकास भगत, मयुर नरवाडे, ईश्वर भदाले उपस्थित होते.