एकलारातील सत्ताधार्‍यांच्या कारभारावर युवापिढीची नाराजी!; म्हणाले, यावेळी पुन्हा चूक होणार नाही!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या 10 वर्षांतील सत्ताधार्यांच्या कारभारावर नाराजी दर्शवत युवापुढीने यंदा एकलारा गावात परिवर्तन घडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. इतर गावांच्या तुलनेत एकलारा गाव विकासाच्या बाबतीत खूप मागे पडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अनेक तरुणांना पोलीस भरती आणि सैनिक भरतीची तयारी करून देशसेवा करण्याची इच्छा आहे. परंतु 6000 लोकसंख्या असलेल्या या गावात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या 10 वर्षांतील सत्ताधार्‍यांच्या कारभारावर नाराजी दर्शवत युवापुढीने यंदा एकलारा गावात परिवर्तन घडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. इतर गावांच्या तुलनेत एकलारा गाव विकासाच्या बाबतीत खूप मागे पडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

अनेक तरुणांना पोलीस भरती आणि सैनिक भरतीची तयारी करून देशसेवा करण्याची इच्छा आहे. परंतु 6000 लोकसंख्या असलेल्या या गावात मैदानच नाही. त्यामुळे काही तरुणांना त्यासाठी तालुक्याला जावे लागते. गावात सत्ताधारी मंडळींनी युवकांच्या हिताचे कोणतेही उपक्रम आजपर्यंत राबविले नसल्याचा आरोप युवक करतात. यासोबतच दाखवत असलेल्या विकासकामांमध्येही प्रचंड खोटेपणा आहेत. गावात रस्ते, नाल्या आणि घाणीची खूप मोठी समस्या आहे. सत्ताधार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप युवापिढी करत आहे. याउलट यंदा परिवर्तन पॅनेलने उच्चशिक्षित, अनुभवी तसेच तरुण पिढीला गावाच्या विकासाची संधी दिली आहे. परिवर्तन पॅनलच्या जाहीरनाम्यात गावाच्या सर्वांगीण विकासोबतच युवकांसाठी पोलीस भरती, आर्मी भरतीची तयारी करण्यासाठी सर्व सोयींनी युक्त असे क्रीडांगण उभारण्याच्या प्रयत्नांचाही समावेश असल्याने परिवर्तन पॅनलला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.