एकाच दिवशी तब्‍बल 328 जणांना कोरोना लसीकरण, कोलाऱ्याचा विक्रम!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारतर्फे कोरोना लसीकरण महोत्सव सुरू आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन चिखली तालुक्याच्या लाेकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी जनतेला केलेले आहे. याच अनुषंगाने काल, 15 एप्रिल रोजी कोलारा (ता. चिखली) येथे श्री सिद्धेश्वर महाराज संस्थानमध्ये लसीकरण अभियान …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव, भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारतर्फे कोरोना लसीकरण महोत्सव सुरू आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन चिखली तालुक्याच्या लाेकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी जनतेला केलेले आहे. याच अनुषंगाने  काल, 15 एप्रिल रोजी कोलारा (ता. चिखली) येथे श्री सिद्धेश्वर महाराज संस्थानमध्ये लसीकरण अभियान राबविण्यात आले. यात एकाच दिवशी तब्‍बल 328 लाभार्थ्यांना  लसीकरण करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉ.कृष्णकुमार सपकाळ, पं.स.सदस्य सौ. मनिषाताई सपकाळ, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव पाटील सोळंकी, कोलाराच्या सरपंच सौ. वनिता सोळंकी, माजी सरपंच भिकाजी सोळंकी, माजी सरपंच भगवानराव सोळंकी, गणेश सोळंकी, धोंडू पाटील सोळंकी, किसनराव सोळंकी, साहेबराव सोळंकी, उद्धवराव पवार, शेषराव सोळंकी, नामदेवराव सपकाळ, वसंतराव सोळंकी, बाबूतात्या सोळंकी, लक्ष्मण सोळंकी, संजय सोळंकी, समाधान सोळंकी, गजानन सोळंकी, विष्णू सोळंकी, श्रीराम सोळंकी, रमेश सोळंकी, प्रताप सोळंकी, कैलास सोळंकी, प्रकाश सोळंकी दुकानदार, मोहन सोळंकी, निवृत्ती नाना सोळंकी, संतोष सोळंकी आदींच्‍या उपस्थितीत हा लसीकरण सोहळा पार पडला. लसीकरण राबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अंत्री खेडेकरचे आरोग्य अधिकारी डॉ. विनोद वायाळ, आरोग्य सेवक श्री. काकडे, श्री. कस्तुरे, आरोग्य सेविका सौ. काळुसे, आरोग्य विभागातील इतर सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मोहिमेसाठी गावातील युवा कार्यकर्ते डॉ.विठ्ठल सोळंकी, सरपंच पती रामेश्वर सोळंकी, जीवन सोळंकी, ऋषिकेश सोळंकी, अनंथा सोळंकी, पप्पू सोळंकी, जगन्‍नाथ सोळंकी आदींनी पुढाकार घेतला.