एकाच दिवशी ५१५ ग्रामस्‍थांना कोरोना लसीकरण!; पाडळी आरोग्‍य केंद्राचा पुढाकार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाडळी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या मासरूळ (ता. बुलडाणा) येथे कोरोना लसीकरण शिबिर आज, ४ सप्टेंबरला राबविण्यात आले. एकाच दिवशी तब्बल ५१५ ग्रामस्थांना लसीकरण करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरपाते यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिकारी डॉ. जवरे, डॉ. बाहेकर यांच्या पुढाकाराने हे शिबीर आयोजित केले होते. यावेळी पाडळी आरोग्य केंद्राचे …
 
एकाच दिवशी ५१५ ग्रामस्‍थांना कोरोना लसीकरण!; पाडळी आरोग्‍य केंद्राचा पुढाकार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पाडळी प्राथमिक आरोग्‍य केंद्राअंतर्गत येणाऱ्या मासरूळ (ता. बुलडाणा) येथे कोरोना लसीकरण शिबिर आज, ४ सप्‍टेंबरला राबविण्यात आले. एकाच दिवशी तब्‍बल ५१५ ग्रामस्‍थांना लसीकरण करण्यात आले. तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. सरपाते यांच्‍या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिकारी डॉ. जवरे, डॉ. बाहेकर यांच्‍या पुढाकाराने हे शिबीर आयोजित केले होते. यावेळी पाडळी आरोग्‍य केंद्राचे आरोग्‍य सहायक डी. डी. जाधव, समुदाय आरोग्‍य अधिकारी डॉ. कायंदे, डॉ. सरकटे, आरोग्‍य सेविका सौ. काकडे, सौ. सोनुने, सौ. पुर्भे, जेऊघाले सिस्‍टर, आरोग्‍य सेवक पंकज कंडारे, कुलदीप सावळे, सचिन चिंचोले, प्रदीप चौधरी, नितीन गायकवाड यांनी लसीकरण केले. सरपंच मधु महाले, शेषराव सावळे व ग्रामपंचायत सदस्यांनी आरोग्‍य पथकाला चांगले सहकार्य केले.