एका दिवसातच बदलल्या वेळा! आता सकाळी 7 ते 11 पर्यंतच अत्‍यावश्यक सेवेतील दुकाने राहणार सुरू

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा )ः 19 एप्रिल रोजीच्या आदेशात बदल करून अत्यावश्यक सेवा अंतर्गतच्या दुकानांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. यानुसार या दुकानांसह पेट्रोल पंप सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यानच सुरू ठेवता येणार आहेत. 19 तारखेला निर्गमित आदेशात अत्यावश्यक सेवांची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यान करण्यात आली होती. मात्र आज नव्याने …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा )ः  19 एप्रिल रोजीच्या आदेशात  बदल करून अत्यावश्यक सेवा अंतर्गतच्या दुकानांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. यानुसार या दुकानांसह पेट्रोल पंप सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यानच सुरू ठेवता येणार आहेत.

19 तारखेला निर्गमित आदेशात अत्यावश्यक सेवांची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेदरम्यान करण्यात आली होती. मात्र आज नव्याने सुधारित आदेश काढण्यात आले. आता किराणा, डेअरी, भाजीपाला, फळे, मटण- चिकन- मासे विक्री, कृषी संबंधित दुकाने, पशु खाद्य व्यवसाय व पावसाच्या हंगामासाठी  साहित्य तयार करणाऱ्या उत्पादकांची दुकाने सकाळी 7 ते 11 दरम्यानच सुरू राहतील. मात्र त्यांना सकाळी 7 ते रात्री 8 दरम्यान होम डिलिव्हरी (घरपोच सेवा) देता येणार आहे. शहर व गावातील पेट्रोल पंप सकाळी 7 ते 11 दरम्यानच सुरू राहणार आहेत. हायवे वरील पंप मात्र 24 तास सुरू राहतील. आरोग्य, पोलीस, पाणी पुरवठा, पालिका आदी कार्यालये वगळता इतर कार्यालये, विमा कार्यालय, एटीएम, बँक यांची वेळ देखील सकाळी 10 ते दुपारी 2 अशी करण्यात आली आहे.