एका दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला मागून उडविले; ५ जण जखमी, बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव दुचाकीने समोरील दुचाकीला मागून धडक दिली. यात ७० वर्षीय वृद्धेसह ५ जण जखमी झाले. ही घटना आज, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बुलडाणा शहरातील खामगाव रोडवरील विजय वाईन बारसमोर घडली. सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गजानन पडघान (४०, रा. डोंगरखंडाळा, ह. मु. बुलडाणा) हे आज दुपारी …
 
एका दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला मागून उडविले; ५ जण जखमी, बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव दुचाकीने समोरील दुचाकीला मागून धडक दिली. यात ७० वर्षीय वृद्धेसह ५ जण जखमी झाले. ही घटना आज, १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बुलडाणा शहरातील खामगाव रोडवरील विजय वाईन बारसमोर घडली. सर्व जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गजानन पडघान (४०, रा. डोंगरखंडाळा, ह. मु. बुलडाणा) हे आज दुपारी त्यांची आई अनुसयाबाई पडघान (७०) व मुलगी संस्कृतीला (६) घेऊन उबाळखेड (ता. मोताळा ) येथून घराकडे येत होते. खामगाव रोडवरील विजय वाईन बारसमोर मागून येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. यात गजानन पडघान, अनुसयाबाई पडघान, संस्कृती पडघान व धडक देणाऱ्या दुचाकीवरील दोन्ही तरुण असे एकूण ५ जण जखमी झाले. जखमींना नागरिकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.