एकुलत्या एक गणेशला धडक देऊन वाहन पसार, जागीच मृत्‍यू, वर्षभरापूर्वीच झाले होते लग्‍न!; चिखली तालुक्‍यातील दुर्घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. ही घटना आज, ३ ऑगस्टला सकाळी साडेनऊच्या सुमारास अंचरवाडी फाट्याजवळ घडली. गणेश समाधान थुट्टे (२५, रा. भरोसा ता. चिखली) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.गणेश दुचाकीने अंढेरा फाट्याकडून भरोसाकडे चालला होता. अंढेरा ते अंचरवाडी दरम्यानच्या वळणावर अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली.धडक …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. ही घटना आज, ३ ऑगस्टला सकाळी साडेनऊच्‍या सुमारास अंचरवाडी फाट्याजवळ घडली. गणेश समाधान थुट्टे (२५, रा. भरोसा ता. चिखली) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
गणेश दुचाकीने अंढेरा फाट्याकडून भरोसाकडे चालला होता. अंढेरा ते अंचरवाडी दरम्यानच्या वळणावर अज्ञात वाहनाने त्‍याला धडक दिली.धडक एवढी भीषण होती की गणेशचा जागीच मृत्यू झाला. धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले. गणेश त्याच्या आई- वडिलांना एकुलता एक मुलगा असून गेल्या वर्षीच त्याचा विवाह झाला होता. त्याला तीन बहिणी असून, तिघींचे लग्न झाले आहे.