एक कॉल आला… अन्‌ सैनिकाचे पावणेतीन लाख घेऊन गेला; खामगाव येथील धक्‍कादायक घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अडीच हजारांच्या गिफ्टच्या मोहामायी एका सैनिकाने तब्बल पावणेतीन लाख रुपये गमावले आहेत. मोबाइलवर आलेल्या कॉलने त्यांना मोहात पाडले अन् गंडा घातला. खामगाव येथे हा प्रकार 31 मे रोजी समोर आला. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रमेश नरबहादूर थापा हे महाराष्ट्र बटालियनमध्ये असून, …
 
एक कॉल आला… अन्‌ सैनिकाचे पावणेतीन लाख घेऊन गेला; खामगाव येथील धक्‍कादायक घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अडीच हजारांच्‍या गिफ्‍टच्‍या मोहामायी एका सैनिकाने तब्‍बल पावणेतीन लाख रुपये गमावले आहेत. मोबाइलवर आलेल्या कॉलने त्‍यांना मोहात पाडले अन्‌ गंडा घातला. खामगाव येथे हा प्रकार 31 मे रोजी समोर आला. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी भामट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

प्रमेश नरबहादूर थापा हे महाराष्ट्र बटालियनमध्ये असून, सध्या खामगाव येथील एनसीसीमध्ये कार्यरत आहेत. त्‍यांना 31 मे रोजी सायंकाळी 5:30 च्या सुमारास मोबाइलवर मुकेशकुमार नावाच्या व्यक्तीचा कॉल आला. त्‍याने सांगितले की तुम्हाला 2 हजार 500 रुपयांचे गिफ्ट लागले आहे. मी तुम्हाला तुमच्या मोबाइलवर लिंक पाठवत असून, त्यावर तुम्ही क्लिक केल्यास तुमच्या गिफ्टची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल. यानंतर प्रमेश थापा यांनी त्यांच्या मोबाइलवर आलेली लिंक ओपन करून त्यावर आलेला ओटीपी नंबर मुकेशकुमारला दिला.

यानंतर मुकेशकुमारने थापा यांच्या बँक खात्यातील आधी 1 लाख 99 हजार 999 रुपये व दुसऱ्यांदा 80 हजार रुपये असा एकूण 2 लाख 79 हजार 999 रुपये ऑनलाइन काढले. खात्‍यातून पैसे गायब झाल्याचे कळताच थापा यांना फसवणूक झाल्‍याचे लक्षात आले. त्यांनी खामगाव शहर पोलीस ठाणे गाठून काल, 1 जूनला तक्रार दिली. तपास ठाणेदार सुनील अंबुलकर करत आहेत.