एप्रिल मध्यावरच 90 प्रकल्पांतील जलसाठ्यात घट! 9 लघुप्रकल्पांत उरला केवळ गाळ!! अनेक धरणांत चिंताजनक साठा

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : एप्रिल महिन्याच्या मध्यावरच जिल्ह्यातील तब्बल 90 धरणांतील जलसाठ्यांत लक्षणीय घट झाल्याचे धक्कादायक चित्र आहे. आजघडीला 9 लघुप्रकल्प कोरडे पडले असून, मध्यम व मोठ्या धरणांतील जलसाठाही चिंताजनक आहे. जिल्ह्यात एकूण 91 सिंचन प्रकल्प असून, यामध्ये 3 मोठे, 7 मध्यम तर 81 लघुप्रकल्प आहेत. यातील लघुप्रकल्पांत सरासरी 10.94 टक्के …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) : एप्रिल महिन्याच्या मध्यावरच जिल्ह्यातील तब्बल 90 धरणांतील जलसाठ्यांत लक्षणीय घट झाल्याचे धक्कादायक चित्र आहे. आजघडीला 9 लघुप्रकल्प कोरडे पडले असून, मध्यम व मोठ्या धरणांतील जलसाठाही चिंताजनक आहे.

जिल्ह्यात एकूण 91 सिंचन प्रकल्प असून, यामध्ये 3 मोठे, 7 मध्यम तर 81 लघुप्रकल्प आहेत. यातील लघुप्रकल्पांत सरासरी 10.94 टक्के इतकाच जलसाठा उरलाय! मोठ्या पैकी खडकपूर्णामध्ये 23.73 टक्के, पेनटाकळीमध्ये 36.92 तर मळगंगामध्ये 36.96 टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. मध्यममधील ज्ञानगंगा( 64 टक्के), कोराडी ( 51 टक्के) मधीलच जलसाठा काहीसा समाधानकारक आहे. पलढग 15.58 टक्के, तोरणा 19,  उतावली 35.37,  मस 40, मन 49. 93टक्के या प्रकल्पातील जलसाठ्यात घट झाली आहे.

9 प्रकल्प कोरडेठाक!

दरम्यान 9 लघु प्रकल्प  कोरडे पडले असून त्यात केवळ गाळ उरलाय! यामध्ये मातला, शेकापूर (ता. बुलडाणा),  केसापूर (ता. चिखली), अंढेरा (ता. देऊळगाव राजा), बोरजवळा (ता. खामगाव) , कोलही गोलार, वारी-2 (ता. मोताळा), लोणवडी (ता. नांदुरा) व लांजूळ(ता. शेगाव) या प्रकल्पांचा समावेश आहे.