‘एल्‍गार’ने मानले राज्‍य सरकारचे आभार!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पीक पिम्याच्या लढाईला शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत निर्णय दिल्याने एल्गार संघटनेतर्फे राज्य सरकारने आभार मानण्यात आले आहे. राज्य सरकारने दुसऱ्या टप्प्यात पिकविमा कंपनीला देण्यात येणारा हप्ता मंजूर करतानाच वेळोवेळी राज्य शासनाने काढलेले आदेश व परिपत्रक या नुसार हा निधी खर्च करण्याचे आदेशित केले आहे. या लढ्यासाठी एल्गार …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पीक पिम्‍याच्‍या लढाईला शासनाने सकारात्‍मक प्रतिसाद देत निर्णय दिल्याने एल्‍गार संघटनेतर्फे राज्‍य सरकारने आभार मानण्यात आले आहे.

राज्य सरकारने दुसऱ्या टप्प्यात पिकविमा कंपनीला देण्यात येणारा हप्ता मंजूर करतानाच वेळोवेळी राज्य शासनाने काढलेले आदेश व परिपत्रक या नुसार हा निधी खर्च करण्याचे आदेशित केले आहे. या लढ्यासाठी एल्गार संघटनेने जळगाव जामोदला सुरुवातीला निवेदन व नंतर 10 हजार शेतकरी वर्गाला रस्त्यावर उतरवून आंदोलन केले होते. कृषिमंत्री दादाजी भुसे यांना ‘एल्गार’चे अध्यक्ष प्रसेनजीत पाटील भेटले होते. शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठीची ही लढाई अंतिम टप्प्यात असली तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा रक्कम जमा होईपर्यंत एल्गार संघटना ही लढाई चालूच ठेवेल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.