एसटीचा कंडक्‍टर बसफेरीचा हिशोब न देताच गायब!; शेगावमधील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव आगारातील वाहक बसफेरीचा हिशोब न देताच बेपत्ता झाल्याची घटना ५ सप्टेंबरला घडली. संदीप रमेश शत्रे (३२, रा. तारतडस, जि. परभणी) असे बेपत्ता झालेल्या वाहकाचे नाव आहे. काल, १५ सप्टेंबर रोजी संदीपचा भाऊ विनोदने शेगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली. ५ सप्टेंबर रोजी संदीप चिंचखेड- शेगाव …
 
एसटीचा कंडक्‍टर बसफेरीचा हिशोब न देताच गायब!; शेगावमधील घटना

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव आगारातील वाहक बसफेरीचा हिशोब न देताच बेपत्ता झाल्याची घटना ५ सप्टेंबरला घडली. संदीप रमेश शत्रे (३२, रा. तारतडस, जि. परभणी) असे बेपत्ता झालेल्या वाहकाचे नाव आहे. काल, १५ सप्टेंबर रोजी संदीपचा भाऊ विनोदने शेगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली.

५ सप्टेंबर रोजी संदीप चिंचखेड- शेगाव बस घेऊन शेगाव आगारात सकाळी सातच्या सुमारास आला. बस लावल्यानंतर तो आगारप्रमुख व वाहतूक नियंत्रण कक्षात गेला नाही. हिशोब न देताच तो प्रवाशी उत्पन्न अंदाजे ४ ते ५ हजार रुपये व तिकिट ट्रे मशीन किंमत ३० हजार रुपये घेऊन बेपत्ता झाला. याप्रकरणी शेगाव आगाराने लेखी तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती. गेल्या १० दिवसांत शोध घेऊनही तो न सापडल्याने काल संदीपचा भाऊ विनोदनेही बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.