एसटी आगारप्रमुखाची कॉलर धरली; ड्रायव्हरविरुद्ध गुन्हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुटी मंजूर का करत नाही असे म्हणून एसटी आगार प्रमुखाची कॉलर धरत वाद घालणार्या बस चालकाविरोधात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आगारप्रमुख रवींद्र मोरे यांनी चालक ए. एल. वाडके यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. मारहाण करताना चालक व्यसनाधीन होता, असा आरोप मोरे यांनी केला आहे. मोरे कार्यालयीन कामकाजानिमित्त …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुटी मंजूर का करत नाही असे म्हणून एसटी आगार प्रमुखाची कॉलर धरत वाद घालणार्‍या बस चालकाविरोधात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगारप्रमुख रवींद्र मोरे यांनी चालक ए. एल. वाडके यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. मारहाण करताना चालक व्यसनाधीन होता, असा आरोप मोरे यांनी केला आहे. मोरे कार्यालयीन कामकाजानिमित्त आगाराच्या गेटजवळ काल संध्याकाळी 5 च्या सुमारास वाहक नियंत्रक व सुरक्षा रक्षकांसोबत चर्चा करत होते. त्यावेळी तिथे वाडके आले. मी सुटीचा अर्ज केला आहे. तुम्ही सुटी मंजूर का करत नाही, असे म्हणत त्यांनी मोरे यांच्याशी वाद घालून अश्‍लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर मोरे यांची कॉलर धरून मारहाण करत त्यांना खाली पाडले, असे तक्रारीत म्हटले आहे.