एसटी बस- दुचाकीची धडक; वनरक्षक गंभीर जखमी; बोथा घाटातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार वनरक्षक गंभीर जखमी झाला. ही घटना आज, 26 मार्चला रात्री पावणे आठच्या सुमारास बोथा घाटातील देवरी फाट्याजवळ घडली. नितीन आत्माराम सिरसाट (40, रा. भादोला, ता. बुलडाणा) असे गंभीर जखमी वनरक्षकाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खामगाव आगाराची …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार वनरक्षक गंभीर जखमी झाला. ही घटना आज, 26 मार्चला रात्री पावणे आठच्या सुमारास  बोथा घाटातील देवरी फाट्याजवळ घडली.

नितीन आत्माराम सिरसाट (40, रा. भादोला, ता. बुलडाणा) असे गंभीर जखमी वनरक्षकाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खामगाव आगाराची बुलडाणा- खामगाव बस (क्र एमएच 40- 9488) खामगावकडे जात असताना देवरी फाट्याजवळ रस्त्यात उभ्या मजुरांच्या वाहनाला वाचवण्याचा प्रयत्नात समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकली. यात दुचाकीस्वार वनरक्षक नितीन आत्माराम सिरसाट गंभीर जखमी झाले. एसटीच्या चालक, वाहकांनी खासगी वाहनातून त्याला लगेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.