एसटी बस पुलावरून वाहत्‍या नदीत पडली!; सुदैवाने जिवीत हानी नाही!!, मेहकर तालुक्यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव आगाराची एस.टी. बस पुलावरून घसरून वाहत्या नदीत पडली. पुलाची उंची कमी असल्याने चालक व वाहकासह बसमधील सर्वच्या सर्व १५ प्रवाशी सुरक्षित आहेत. हा अपघात देऊळगाव साकर्शा-अकोला रस्त्यावरील उतावळी पुलावर आज, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास घडला. खामगाव आगाराची एस.टी. बस (क्र. एमएच ४० एन ८९२२) ही आलेगाव (ता. …
 
एसटी बस पुलावरून वाहत्‍या नदीत पडली!; सुदैवाने जिवीत हानी नाही!!, मेहकर तालुक्यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगाव आगाराची एस.टी. बस पुलावरून घसरून वाहत्या नदीत पडली. पुलाची उंची कमी असल्याने चालक व वाहकासह बसमधील सर्वच्या सर्व १५ प्रवाशी सुरक्षित आहेत. हा अपघात देऊळगाव साकर्शा-अकोला रस्त्यावरील उतावळी पुलावर आज, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेआठच्या सुमारास घडला.

खामगाव आगाराची एस.टी. बस (क्र. एमएच ४० एन ८९२२) ही आलेगाव (ता. पातूर, जि. अकोला) येथे मुक्कामी गेली होती. आज सकाळी खामगावकडे परतत असताना देऊळगाव साकर्शाजवळील उतावळी पुलावरून पाणी वाहत असल्याने खड्ड्यामुळे बस पुलाखाली गेली. मात्र पुलाची उंची केवळ ३ फूट असल्याने सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. स्थानिक नागरिकांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.