एसटी महामंडळाची महाकार्गो सेवा; माल वाहतुकीसाठी मिळाली परवानगी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः राज्य शासनाने एस. टी. महामंडळास माल वाहतुकीची परवानगी दिली असून, या सेवेचे नामकरण महाकार्गो करण्यात आले आहे. सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी केले आहे. शासनाच्या विविध विभागांमार्फत निविदा प्रक्रिया राबवून खासगी मालवाहतूकदारांमार्फत शासकीय मालाची जी मालवाहतूक करण्यात येते त्यात एस. टी. महामंडळास 25 टक्के मालवाहतुकीचे काम देण्यात …
 
एसटी महामंडळाची महाकार्गो सेवा; माल वाहतुकीसाठी मिळाली परवानगी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः राज्य शासनाने एस. टी. महामंडळास माल वाहतुकीची परवानगी दिली असून, या सेवेचे नामकरण महाकार्गो करण्यात आले आहे. सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी केले आहे.

शासनाच्या विविध विभागांमार्फत निविदा प्रक्रिया राबवून खासगी मालवाहतूकदारांमार्फत शासकीय मालाची जी मालवाहतूक करण्यात येते त्यात एस. टी. महामंडळास 25 टक्के मालवाहतुकीचे काम देण्यात यावे. हे 25 टक्के काम हे विभागाच्या निविदा प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आलेल्या खासगी वाहतूकदारांना जो दर अनुज्ञेय करण्यात येईल, त्या दराने देण्यात यावा. त्यासाठी महामंडळास निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची आवश्यकता असणार नाही, असा धोरणात्मक शासन निर्णय घेण्यात आला आहे. महाकार्गो सेवेतंर्गत मालवाहतूक करण्यासाठी बुलडाणा विभागाच्या कक्ष प्रमुखांच्या 8830279722 क्रमांकावर तसेच संबंधित आगार प्रमुखांकडे संपर्क करावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.