ऐकलं का… ऑगस्टमध्ये १५ दिवस बँका बंद!

मुंबई : रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या सुटीच्या यादीनुसार ऑगस्ट महिन्यात तब्बल १५ दिवस बँकांना सुटी आहे. अर्थात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या सुट्या आहेत. त्यामुळे देशभर एकाच दिवशी बँका बंद राहणार नाहीत. या दिवसांमध्ये फक्त काही राज्यात बँका बंद राहणार आहेत. ऑगस्टची सुरुवात बँकांच्या सुटीपासून होत आहे. कारण त्या दिवशी रविवार आहे.त्यानंतर ८ ऑगस्ट, १५ ऑगस्ट, २२ …
 

मुंबई : रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या सुटीच्या यादीनुसार ऑगस्ट महिन्यात तब्बल १५ दिवस बँकांना सुटी आहे. अर्थात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या सुट्या आहेत. त्यामुळे देशभर एकाच दिवशी बँका बंद राहणार नाहीत. या दिवसांमध्ये फक्त काही राज्यात बँका बंद राहणार आहेत.

ऑगस्टची सुरुवात बँकांच्या सुटीपासून होत आहे. कारण त्या दिवशी रविवार आहे.त्‍यानंतर ८ ऑगस्ट, १५ ऑगस्ट, २२ ऑगस्ट आणि २९ ऑगस्टला रविवार असल्याने बँका बंदच राहतील. म्हणडे आॅगस्टमध्ये पाच रविवार आणि दुसरा व चाैथा शनिवार असे सात दिवस बँकांचे कामकाज देशभर बंद असेल. १४ ऑगस्ट व २८ ऑगस्टला दुसरा व चाैथा शनिवार आहे. १३ ऑगस्टला पॅट्रियट टे- निमित्त इंफाळमध्ये बँका बंद ठेवण्यात येतील. १६ ऑगस्ट- पारसी नववर्ष असल्याने आणि १५ आॅगस्टला रविवार असल्याने देशभरातील बँका दोन दिवस सलग बंद असतील. १९ ऑगस्ट- मुहर्रम (अशुरा), २० ऑगस्ट- मुहर्रम/फर्स्ट ओणम, २१ ऑगस्ट- थिरुवोणम- कोच्ची आणि तिरुवनंतपूरममध्ये बँका बंद असतील. २३ ऑगस्टला नारायणा गुरु जयंतीनिमित्त कोच्ची आणि तिरुवनंतपूरममध्ये बँका बंद राहतील. ३० ऑगस्ट – श्रीकृष्ण जयंती, ३१ ऑगस्ट- श्री कृष्णाष्टमी असल्याने काही ठिकाणी बँका बंद असतील.