ऐकलं का?..चिखलीत राष्ट्रवादीने मानले चक्‍क मोदींचे आभार!; शहरात झळकले पोस्‍टर!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाढत्या महागाईचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने चिखलीत निषेध करण्यात आला आहे. शहरात विविध ठिकाणी थँक्यू मोदी सरकार असं लिहिलेले पोस्टर झळकत असल्याने शहरभर या अनोख्या निषेधाची चर्चा आज, 18 मार्चला होत आहे. ‘बेसुमार वाढलेली बेरोजगारी,आकाशाला भिडलेली महागाई, पेट्रोलचे दर शंभरी पार, खड्ड्यात गेला शेअर बाजार, सब जगह से पड …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वाढत्या महागाईचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने चिखलीत निषेध करण्यात आला आहे. शहरात विविध ठिकाणी थँक्यू मोदी सरकार असं लिहिलेले पोस्टर झळकत असल्याने शहरभर या अनोख्या निषेधाची चर्चा आज, 18 मार्चला होत आहे. ‘बेसुमार वाढलेली बेरोजगारी,आकाशाला भिडलेली महागाई, पेट्रोलचे दर शंभरी पार, खड्ड्यात गेला शेअर बाजार, सब जगह से पड रही मार, थँक्यू मोदी सरकार…’ असे पोस्टर विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या चिखली शहर शाखेने हे पोस्‍टर्स लावले आहेत.