ऐकलं का… बुलडाण्यात म्‍हणे हळदीला लगडली फुलं!

बुलडाणा (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हळदीच्या झाडाला फुलं लगडत नाहीत. जर फुलं लगडलीच तर ती अतिअति दुर्मिळ बाब असते, असे म्हणतात. अशीच ही दुर्मिळ बाब चक्क बुलडाण्यातील एका गृहिणीच्या परसबागेत दिसून आली आहे. या गृहिणीने बुलडाणा लाइव्हला कळवलं अन् कुतूहलाची बाब बघण्यासाठी बुलडाणा लाइव्हसुद्धा तिथं गेलं… वृक्षारोपण अन् संवर्धनाची आवड असलेल्या या …
 
ऐकलं का… बुलडाण्यात म्‍हणे हळदीला लगडली फुलं!

बुलडाणा (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हळदीच्‍या झाडाला फुलं लगडत नाहीत. जर फुलं लगडलीच तर ती अतिअति दुर्मिळ बाब असते, असे म्‍हणतात. अशीच ही दुर्मिळ बाब चक्क बुलडाण्यातील एका गृहिणीच्‍या परसबागेत दिसून आली आहे. या गृहिणीने बुलडाणा लाइव्हला कळवलं अन्‌ कुतूहलाची बाब बघण्यासाठी बुलडाणा लाइव्हसुद्धा तिथं गेलं… वृक्षारोपण अन्‌ संवर्धनाची आवड असलेल्या या गृहिणीने घराचे आवार फुलझाडांनी व्यापवले आहेच; पण अगदी टेरेसही वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे दिसून येतात. सौ. चंचल महेश चाकणकर असे या गृहिणीचे नाव आणि त्‍यांना या कार्यात सहकार्य करतात ते त्‍यांचे पती महेश चाकणकर.

ऐकलं का… बुलडाण्यात म्‍हणे हळदीला लगडली फुलं!

जांभरूण रोडवरील गणराजनगरात हे दाम्‍पत्‍य राहते. श्री. चाकणकर यांचा औषधी विक्रीचा व्यवसाय आहे. सौ. चंचल चाकणकर यांनी परसबागेत हळदीची झाडे लावलेली होती. हळदीला फुले येण्याचा प्रकार हा दुर्मिळ मानला जातो. आपल्या परसबागेतील हळदीला फुले लगडली हे जेव्हा सौ. चाकणकर यांनी पाहिले तेव्हा सर्वांना आनंदाने सांगितले. प्रत्येकानेच त्‍यांना असं कधी होतं का, असं म्‍हणत आश्चर्य व्‍यक्‍त केले. बुलडाणा लाइव्हने याबद्दल ज्‍येष्ठ शेतकऱ्यांकडून माहिती घेतली असता हळदीला फुले क्‍वचितच येतात, असे सांगण्यात आले. काही शेतकऱ्यांनी तर आजवर हळदीला फुलं आल्याचे पाहिले नाही, असे सांगितले. सामाजिक कार्यातही चाकणकर दाम्‍पत्‍य अग्रेसर असते. जय गजानन ग्रुपद्वारे ते अनेक उपक्रम राबवतात. त्‍यांच्‍या ग्रुपमध्ये सर्वच प्रतिष्ठित मंडळी आहे.

ऐकलं का… बुलडाण्यात म्‍हणे हळदीला लगडली फुलं!
हळदीला फुलं लगडल्यानंतर मोठ्या आनंदाने बुलडाणा लाइव्हला ही बातमी कळवावीशी वाटलेल्या व बुलडाणा लाइव्हचे वर्षभरापासून वाचक असलेल्या चाकणकर दाम्पत्याच्या हस्तेच बुलडाणा मार्केट डिक्शनरीच्या वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. समूह सल्लागार मनोज सांगळे यांच्या हस्ते त्यांना अंक देण्यात आला.