ऐकलं का, लोणवडीचं आरोग्य उपकेंद्र सुरू झालं बरं…!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील लोणवडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चार वर्षांपासून बंद होते. सात गावांचे आरोग्य सांभाळणारे हे उपकेंद्र बंद पडल्याने ग्रामस्थांचे हाल होत होते. याबाबत संभाजी ब्रिगेडने पाठपुरावा केल्याने अखेर उपकेंद्रात आरोग्यसेविका अश्विनी अतुल विखे रुजू झाल्या आहेत. त्यामुळे उपकेंद्राचा वनवास संपला आहे. संभाजी ब्रिगेडने या प्रश्नी बेदमुदत …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील लोणवडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चार वर्षांपासून बंद होते. सात गावांचे आरोग्य सांभाळणारे हे उपकेंद्र बंद पडल्याने ग्रामस्थांचे हाल होत होते. याबाबत संभाजी ब्रिगेडने पाठपुरावा केल्याने अखेर उपकेंद्रात आरोग्यसेविका अश्‍विनी अतुल विखे रुजू झाल्या आहेत. त्यामुळे उपकेंद्राचा वनवास संपला आहे. संभाजी ब्रिगेडने या प्रश्‍नी बेदमुदत उपोषणही केले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेकडे सातत्याने निवेदने पाठवून अधिकार्‍यांकडे मागणी रेटली होती. अखेर उपकेंद्र सुरू झाल्याने ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण आहे.