ऐकावे ते नवलंच… जाहिरातीचे फ्लेक्स दिसण्यासाठीच तीन झाडांची कत्तल! सूत्रधाराचे नाव आले समोर; बुलडाण्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जाहिरातीचे फ्लेक्स, बॅनर लोकांना दिसावेत म्हणूनच अडथळा ठरणारी जयस्तंभ चौकातील झाडे तोडण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. बाभूळ, वड आणि आंब्याचे झाड कटर मशीनने तोडल्याची घटना 22 मार्च रोजी सकाळी घडली होती. याप्रकरणी 28 मार्च रोजी बुलडाणा शहर पोलिसांनी विजय पुंडलिक गवई(39), रफिक हनिफ चौधरी (32), अफरोज खान अहमद खान …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जाहिरातीचे फ्लेक्स, बॅनर लोकांना दिसावेत म्हणूनच अडथळा ठरणारी जयस्तंभ चौकातील झाडे तोडण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. बाभूळ, वड आणि आंब्याचे झाड कटर मशीनने तोडल्याची घटना 22 मार्च रोजी सकाळी घडली होती. याप्रकरणी 28 मार्च रोजी बुलडाणा शहर पोलिसांनी विजय पुंडलिक गवई(39), रफिक हनिफ चौधरी (32), अफरोज खान अहमद खान (33, तिघेही रा. जोहर नगर या 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. चौकशीत त्यांनी मुख्य सूत्रधाराचे नाव सांगितले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. कैलास पसरटे (रा. खामगाव रोड, सुंदरखेड) याने मजुरी देऊन झाडे तोडायला सांगितल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.

कैलास पसरटे यांचा शहरात फ्लेक्स, बॅनर जाहिरातींचा व्यवसाय करतो. त्‍याने अटकपूर्व जामीन  मिळवल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरातील जयस्तंभ चौक परिसरात बाभळीचे 35 फूट उंच वाढलेले झाड, 40 ते 45 फूट उंचीचे वडाचे झाड व 30 फूट उंचीचे आंब्याचे झाड 22 मार्चच्या  पहाटे तोडून टाकण्यात आले होते. पर्यावरण मित्र अनिरुद्ध माकोने यांना 3 जण झाडे कापताना आढळले होते. ते या व्हिडिओ काढत असताना आरोपी कटर साहित्य सोडून घटनास्थळावरून पळून गेले होते. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. माकोने यांनी काढलेल्या व्हिडिओमुळे आरोपींची ओळख पटली होती. तेव्हापासून आरोपी फरार होते. दरम्यान 28 मार्चला याप्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.