ऑगस्ट अखेरीसही 71 गावांत पाणीटंचाई मुक्कामीच! हजारो गावकऱ्यांना टँकर, खासगी विहिरीद्वारे पाणीपुरवठा; आबालवृद्धांची पायपीट सुरूच

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पावसाळा अंतिम टप्प्यात असतानाही जिल्ह्यातील तब्बल 71 गावांतील पाणीटंचाईचा मुक्काम कायम असल्याचे गंभीर तितकेच मजेदार चित्र आहे. यामुळे हजारो आबालवृद्ध ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरूच असून, त्यांना आपली तहान भागविण्यासाठी टँकर व खासगी विहिरींवरून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. यंदा पावसाने मोजके अपवाद वगळता बहुतेक तालुक्यात …
 
ऑगस्ट अखेरीसही 71 गावांत पाणीटंचाई मुक्कामीच! हजारो गावकऱ्यांना टँकर, खासगी विहिरीद्वारे पाणीपुरवठा; आबालवृद्धांची पायपीट सुरूच

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पावसाळा अंतिम टप्प्यात असतानाही जिल्ह्यातील तब्बल 71 गावांतील पाणीटंचाईचा मुक्काम कायम असल्याचे गंभीर तितकेच मजेदार चित्र आहे. यामुळे हजारो आबालवृद्ध ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरूच असून, त्यांना आपली तहान भागविण्यासाठी टँकर व खासगी विहिरींवरून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

यंदा पावसाने मोजके अपवाद वगळता बहुतेक तालुक्यात नाममात्र हजेरी लावली आहे. यामुळे ऑगस्ट संपत आला तरी 71 गावांतील पाणीटंचाई कायम असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. यामुळे या गावांना टँकर व अधिग्रहित खासगी विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी, हनवतखेड, सावळा, डोंगरखंडाळा, चौथा, सुंदरखेड, चिखली तालुक्यातील असोला तांडा, तांदूळवाडी सैलानीनगर, मोताळा तालुक्यातील पोफळी या गावांमध्ये टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे. याशिवाय 62 गावांतील हजारो राहिवासियांना 67 खासगी अधिग्रहित विहिरीद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे.