ऑटोतून सुरू होती गुटखा वाहतूक; पोलिसांनी सापळा रचून खामगावात घेतले ताब्‍यात, पावणेतीन लाखांची कारवाई

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ऑटोतून गुटखा घेऊन जाणाऱ्या दोघांना खामगाव शहर पोलिसांनी सापळा रचून पकडले. ही कारवाई खामगाव शहरातील केडिया टर्निंगवर काल, 8 एप्रिलच्या भल्या पहाटे साडेसहाला करण्यात आली. ऑटोमध्ये (क्र. MH 28 T 3041) मोहम्मद अबरार मोहम्मद सबदर (32, रा. बर्डे प्लॉट, खामगाव), मोहम्मद अख्तर शेख अयुब (52, रा. जुना …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ऑटोतून गुटखा घेऊन जाणाऱ्या दोघांना खामगाव शहर पोलिसांनी सापळा रचून पकडले. ही कारवाई खामगाव शहरातील केडिया टर्निंगवर काल, 8 एप्रिलच्‍या भल्‍या पहाटे साडेसहाला करण्यात आली.

ऑटोमध्ये (क्र. MH 28 T 3041) मोहम्मद अबरार मोहम्मद सबदर (32, रा. बर्डे प्लॉट, खामगाव), मोहम्मद अख्तर शेख अयुब (52, रा. जुना फैल, खामगाव) हे अवैधरित्या सुगंधी केसरयुक्त विमल पान मसाला व सुगंधित तंबाखू घेऊन जाताना मिळाले. यावेळी 1,87,000 रुपयांचा मुद्देमाल व ऑटो, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 2,85,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या आदेशाने व अप्‍पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल कोळी यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुनील अंबुलकर, पोलीस उपनिरिक्षक गौरव सराग, पो. ना. राजेंद्र टेकाळे, पो. ना. सूरज राठोड, पो.कॉ.अमर ठाकूर, पो. कॉ. प्रफुल्ल टेकाळे, पो. कॉ. जितेंद्र हिवाळे यांनी केली.