ऑटोत बसलेल्या मुलीला मागितला मोबाइल नंबर!; तिने असा शिकवला धडा!, नांदुरा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. ऑटोने प्रवास करत असलेल्या अल्पवयीन मुलीला चक्क तिचा मोबाइल नंबर मागून छेड काढल्याची घटना नांदुरा तालुक्यात २४ जुलैला दुपारी समोर आली आहे. मात्र मुलीने थेट पोलीस गाठे गाठून त्याच्याविरुद्ध तक्रार देत धडा शिकवला. बोराखेडी पोलिसांनी २४ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत बाबुराव मापारी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात छेडछाडीच्‍या घटना वाढल्या आहेत. ऑटोने प्रवास करत असलेल्या अल्पवयीन मुलीला चक्‍क तिचा मोबाइल नंबर मागून छेड काढल्‍याची घटना नांदुरा तालुक्‍यात २४ जुलैला दुपारी समोर आली आहे. मात्र मुलीने थेट पोलीस गाठे गाठून त्‍याच्‍याविरुद्ध तक्रार देत धडा शिकवला. बोराखेडी पोलिसांनी २४ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

प्रशांत बाबुराव मापारी (रा. खैरा, ता. नांदुरा) असे गुन्‍हा दाखल झालेल्याचे नाव असून, पीडित अल्पवयीन मुलगी ज्‍या ऑटोने शेंबा (ता. नांदुरा) येथून मोताळ्याकडे येत होती, त्‍याच ऑटोने तोही प्रवास करत होता. शेंबा येथील नदीच्या पुलावरून ऑटो जात असताना त्‍याने तिच्‍याशी संवाद साधायला सुरुवात केली. तू मला आवडतेस. तुझा मोबाइल नंबर दे असे म्‍हणून छेड काढायला सुरुवात केली. मुलीने हा प्रकार घरच्‍यांना सांगितल्यानंतर, त्‍यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला. बोराखेडी पोलीस ठाणे गाठून मुलीने तक्रार दिली.