ऑटोरिक्षा-टिप्परमध्ये धडक, रिक्षाचालक गंभीर जखमी; नांदुरा शहरातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा- मोताळा मार्गावरील एसटी कॉलनीजवळ ऑटोरिक्षा व टिप्परमध्ये जबर धडक होऊन रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. ही घटना आज, 18 मार्च रोजी सकाळी दहाच्यासुमारास घडली. नांदुराकडून मोताळ्याकडे जात असलेले टिप्पर व लोणवडी येथून नांदुराकडे येत असलेली ऑटोरिक्षा (क्र.एमएच 28 टी 3104) यांच्यात मोरासमोर धडक झाली. यात लोणवडी येथील …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा- मोताळा मार्गावरील एसटी कॉलनीजवळ ऑटोरिक्षा व टिप्परमध्ये जबर धडक होऊन रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. ही घटना आज, 18 मार्च रोजी सकाळी दहाच्‍यासुमारास घडली.

नांदुराकडून मोताळ्याकडे जात असलेले टिप्पर व लोणवडी येथून नांदुराकडे येत असलेली ऑटोरिक्षा (क्र.एमएच 28 टी 3104) यांच्‍यात मोरासमोर धडक झाली. यात लोणवडी येथील सोनाजी वासुदेव चिकटे (31) हा रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्‍याला खामगाव येथील सिल्व्हर सिटी या खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. माहिती मिळताच नांदुरा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.