ऑडिटरनी काय दिवे लावले?; प्रवीण दरेकरांचा धाडमध्ये सवाल; रुग्‍णाच्‍या पत्‍नीचे मंगळसूत्र ठेवून घेण्याचा प्रकार निंदनीय

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. सौभाग्यच लेणं सुद्धा आता असुरक्षित आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. बिलात 11 हजार रुपये कमी आहेत म्हणून रुग्णाच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र खासगी कोविड सेंटरने ठेवून घेतल्याचा प्रकार खामगावमध्ये काही दिवसांपूर्वी समोर आला होता. ही घटना अतिशय निंदनीय …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. सौभाग्यच लेणं सुद्धा आता असुरक्षित आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. बिलात 11 हजार रुपये कमी आहेत म्हणून रुग्णाच्या पत्‍नीच्या गळ्यातील मंगळसूत्र खासगी कोविड सेंटरने ठेवून घेतल्याचा प्रकार खामगावमध्ये काही दिवसांपूर्वी समोर आला होता. ही घटना अतिशय निंदनीय असल्याचे श्री. दरेकर म्हणाले. राज्य सरकारने हॉस्पिटलच्या बिलांची तपासणी करण्यासाठी ऑडिटर नेमले, मात्र या ऑडिटरनी काय दिवे लावले?, असा सवालही त्यांनी केला.

धाड येथील सहकार विद्या मंदिरात आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्‍नांतून 50 खाटांच्या आधार कोविड केअर सेंटरचे उद्‌घाटन आज, 29 मे रोजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्‍यानंतर पत्रकारांशी बोलताना त्‍यांनी राज्‍य सरकारवर टीका केली.
कोरोना महामारीच्या या काळात कोरोना निर्मूलनासाठी केलेला छोटासा प्रयत्न देखील फार मोठा दिलासा देऊन जात आहे. त्यामुळेच आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेले आधार कोविड केअर सेंटर निराधार , गरीब रुग्णांचा आधार ठरणार असल्याचे प्रतिपादन दरेकर यांनी कोविड सेंटरच्‍या उद्‌घाटनावेळी केले.

दयासागर महाले यांच्या स्मृती प्रीत्यर्थ हे आधार कोविड केअर सेंटर सुरू झाले. यावेळी दरेकरांनी या सेंटरसाठी पाच ऑक्सिजन कॉन्‍सट्रेटर देण्याची घोषणाही केली. यावेळी मंचावर माजी आमदार चैनसुख संचेती, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार ॲड. आकाश फुंडकर, बुलडाणा अर्बनचे र्वेसर्वा राधेश्याम चांडक, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, ॲड. विजय कोठारी आदींची उपस्‍थिती होती.