ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 248 उमेदवारांचा सहभाग

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ते 14 मार्च दरम्यान पं. दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात एकूण 248 उमेदवारांनी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी करत सहभाग नोंदविला. ऑनलाईन रोजगार मेळाव्यात परम स्किल …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बुलडाणा तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ते 14 मार्च  दरम्‍यान पं. दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात एकूण 248 उमेदवारांनी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी करत सहभाग नोंदविला. ऑनलाईन रोजगार मेळाव्यात परम स्किल इंडिया ट्रेनिंग प्रा. लि औरंगाबाद, सतिशजी इन्फ्राटेक ॲण्ड मीडिया प्रा. लि. चिखली,  किसान इन्फोटेक प्रा. लि पुणे, रेनस्टॅन्ड इंडिया प्रा. लि पुणे, सुझूकी शोरूम बुलडाणा या कंपन्यांनी उमेदवारांच्या विविध 99 पदांसाठी  सहभाग घेतला, असे सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी कळविले आहे.