‘ओझे‘ झालेले पुरावे ‘वाझें‘नी नदीत फेकले

एनआयएच्या टीमने मिठी नदीचा तळ गाठून काढले बाहेर मुंबई : मनसूख हिरेन आत्महत्या प्रकरण आणि अॅन्टिलिया बंगल्याबाहेरील शस्त्रास्त्रे प्रकरणाचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकाने आज या प्रकरणात आणखी पुरावे शोधून काढले आहेत. त्यासाठी त्यांनी मिठी नदीचा तळ गाठला.तेथून काही वाहनांच्या नंबर प्लेट,सीपीयू, डीव्हीआर व इतर महत्वाच्या वस्तू जप्त केल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांचे …
 

एनआयएच्या टीमने मिठी नदीचा तळ गाठून काढले बाहेर

मुंबई : मनसूख हिरेन आत्महत्या प्रकरण आणि अ‍ॅन्टिलिया बंगल्याबाहेरील शस्त्रास्त्रे प्रकरणाचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकाने आज या प्रकरणात आणखी पुरावे शोधून काढले आहेत. त्यासाठी त्यांनी मिठी नदीचा तळ गाठला.तेथून काही वाहनांच्या नंबर प्लेट,सीपीयू, डीव्हीआर व इतर महत्वाच्या वस्तू जप्त केल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांचे ओझे आपल्या मानगुटीवर बसून नये म्हणून निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने हे पुरावे नदीत फेकून ते नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.पण ते शेवटी तपास पथकाच्या हाती लागल्याने या दोन्ही प्रकरणांच्या विविध पैलूंवर आता आणखी प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
सचिन वाझे सध्या एनआयए कोठडीत असून वरील दोन्ही प्रकरणात त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीतून प्राप्त माहिती व धागेदोर्‍यांच्या साह्याने पथकाने रविवारी मिठी नदी गाठली. मिठी नदी परिसरात सर्च ऑपरेशन राबवल्यानंतर तेथे पाण्याच्या तळाला सीपीयू, डीव्हीआरचेकाही भाग, वाहनांच्या दोन नंबर प्लेट आदी साहित्य हाती लागले.हे सर्व साहित्य मनसूख हिरेन हत्याप्रकरण व अ‍ॅन्टिलियाबाहेरील शस़्त्र प्रकरणाशी निगडीत असण्याची शक्यता आहे. त्याचे दुवे जुळविण्याचा प्रयत्न आता हे पथक करत आहे.