ओबीसींचे आरक्षण कायम ठेवा!; महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे बुलडाण्यात उपोषण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने आज, २ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द केल्याने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद व महानगरपालिका यामध्ये जे प्रतिनिधित्व मिळत होते ते मिळणार नाही. राज्य सरकारने कोर्टाला …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याच्‍या मागणीसाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने आज, २ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. त्‍यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द केल्याने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद व महानगरपालिका यामध्ये जे प्रतिनिधित्व मिळत होते ते मिळणार नाही. राज्य सरकारने कोर्टाला इम्पिरिकल डाटा सादर न केल्याने हे आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे ओबीसी समाजावर घोर अन्याय झाला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी हे उपोषण करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी, ओबीसींच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे. जातीनिहाय जनगणनेनुसार ओबीसी आरक्षणाचा कायदा करावा या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.