‘ओबीसीं’साठी जिल्हाभर भाजपाचे चक्‍काजाम, कुठे तासभर, कुठे अवघ्या काही निमिटांचे आंदोलन, वाहनांच्‍या लागल्या रांगा, वाचा कुठे कसे झाले आंदोलन…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याचा आरोप करत, या नाकर्तेपणाच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज, २६ जूनला सकाळी ११ पासून जिल्हाभर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. विविध महामार्ग आणि रस्त्यांवर पदाधिकारी, कार्यकर्ते ठाण मांडून बसले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. खामगावमध्ये …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यात महाविकास आघाडी सरकारला अपयश आल्याचा आरोप करत, या नाकर्तेपणाच्‍या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज, २६ जूनला सकाळी ११ पासून जिल्हाभर चक्‍का जाम आंदोलन करण्यात आले. विविध महामार्ग आणि रस्‍त्‍यांवर पदाधिकारी, कार्यकर्ते ठाण मांडून बसले. त्‍यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्‍या लांबच लांब रांगा लागल्या.

खामगावमध्ये फुंडकरांना पोलिसांनी घेतले ताब्‍यात

आमचे खामगावचे प्रतिनिधी भागवत राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला- खामगाव महामार्गावर जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. साडेअकरापासून साडेबारापर्यंत आंदोलन चालले. या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या 4 ते 5 कि.मी.पर्यंत रांगा लागल्या होत्या. दुपारी साडेबाराला आमदार फुंडकर यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वाहतूक सुरळीत झाली. आंदोलनात जिल्हाध्यक्ष आमदार फुंडकर यांच्यासह सागर फुंडकर, ओबीसी समाज बांधव शांताराम बोधे, दिलीप पाटील, विलास काळे, भगवान सोळंके, संतोष येवले, सुरेश गव्हाळ, सुधाकर काळे, अनंता शेळके, देवानंद इंगळे, संजय शिनगारे, शरदचंद्र गायकी, संजय देशमुख, राजेंद्र धानोकर, विजय महाल्ले, मुन्नाभाऊ दळवी, गजानन मुळीक, ज्ञानदेव मानकर, गजानन बाप्पू देशमुख व नगराध्यक्षा सौ. अनिताताई डवरे, रेखा मोरे, उर्मिलाताई गायकी, शीतल मुंडे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.

देऊळगाव राजात वाहतूक विस्कळीत

देऊळगाव राजाचे प्रतिनिधी राजेश कोल्हे यांनी सांगितले, की बसस्थानक चौकात दुपारी साडेबाराला जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आगारातून बाहेर पडणाऱ्या एसटी बसेस रोखल्याने वाहतूक विस्कळीत झाली. जालना, चिखली, देऊळगाव राजा रस्त्यावर दोन कि.मी.पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनात शारदाताई जायभाये, सजित गुंडे, शंकर तलबे, एकनाथ काकड, श्याम बनकर यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले.

शेगावमध्ये वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली

घाटाखालील विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर ताकोते यांनी सांगितले, की शेगाव शहरातील जगदंबा चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मात्र पोलिसांनी आधीच वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविल्याने वाहतुकीला अडथळा झाला नाही. राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना साडेबाराच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. आंदोलनात नगराध्यक्षा सौ. शकुंतलाताई बुच, तालुकाध्यक्ष विजय भालतडक, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, पाणीपुरवठा सभापती पवन महाराज शर्मा, नगरसेवक प्रदीप सांगळे, सौ. कल्पनाताई मसने, भाजपा नेते पांडुरंग बुच, गजानन जवंजाळ, दीपक ढमाळ, माजी नगरसेवक विजय यादव, अमित जाधव, शंकर माळी, मुकिंदा खेळकर, पैलवान विजय बुच, राजेश अग्रवाल यांच्‍यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

बुलडाण्यात आंदोलनाचा फज्जा

बुलडाणा ः जिल्हाभरात भाजपाच्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळत असला तरी जिल्ह्याचे केंद्र असलेल्या बुलडाणा तालुक्यात मात्र आंदोलनाचा फज्जा उडाला. सकाळी 11 वाजता विश्रामभवनासमोर आंदोलन करण्याचे पूर्वनियोजन असताना वेळेवर आंदोलनाचे स्थळ आणि वेळही बदलण्यात आली. त्रिशरण चौकात आंदोलन करण्यात आले. अवघ्या 15 मिनिटात आंदोलकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्‍यामुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. आंदोलनात तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, शिंदे, अरविंद होंडे, किसान आघाडीचे दीपक गवारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटील, माजी तालुकाध्यक्ष सखाराम नरोटे, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव, मंदार बाहेकर, किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष रामेश्वर जगताप, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष माया पद्मने, युवा मोर्चाचे पद्मनाभ बाहेकर, विनायक भाग्यवंत, यश तायडे, गोपाल तायडे, संतोष पालकर, सतीश पाटील, भूषण देहाडराय ,देवेंद्र पायघन ,राजू अपार, गणेश देहेडराय अलका पाठक आदींनी सहभाग घेतला.

मलकापूरमध्ये दोन कि.मी.पर्यंत लागल्या रांगा

मलकापूर ः मलकापूर येथे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वात मलकापूर- नांदुरा रोडवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सकाळी 12 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात हजारो कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. त्यामुळे वाहतुक विस्कळीत होऊन दोन कि.मी. पर्यंत रांगा लागल्या होत्या. दुपारी 1 वाजता संचेती यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनात संजय काजळे, केदार एकडे, संतोष बोबटकार, मिलिंद डवले, मोहन शर्मा, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर अढाव, शिवा तायडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले.

लोणारमध्ये आंदोलनकर्त्यांना काळीपिवळीतून नेले ठाण्यात…

लोणारचे प्रतिनिधी प्रेम सिंगी यांनी सांगितले, की लोणार शहरात बसस्टँड चौकात भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव घिके यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात शंभराहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली. साडेअकरा वाजता आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काहींना पोलिसांच्या गाडीत तर काहींना काळीपिवळीत बसवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. चहापान करून सोडून देण्यात आले.

चिखलीत चक्काजाम

चिखली ः आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिखली येथे चक्काजाम आंदोलन करून ओबीसींच्या न्याय हकासाठी लढा सुरू करण्यात आला आहे. खामगाव चौफुलीवर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी 55 जणांना पकडून नेले. आंदोलनात प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. विजयकुमार कोठारी, शहराध्यक्ष पंडीत देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, सुहास शेटे, सभापती सौ. सिंधूताई तायडे, संतोष काळे पाटील, प्रा. वीरेंद्र वानखेडे, श्रीरंगअण्णा एंडोले, सुदर्शन खरात, सौ. द्वारकाताई भोसले, विनोद सिताफळे, किशोर जामदार, नगरसेवक गोविंद देव्हडे, शैलेश बाहेती, विजय नकवाल, शैलेश बाहेती, सुभाषअप्पा झगडे, संजय आतार, बबनराव राऊत, अनुप महाजन, सागर पुरोहित, ॲड. संजीव सदार, विकास जाधव, सतीश शिंदे, बाळासाहेब हाडगे, अनमोल ढोरे, विक्की हरपाळे, नगरसेवक नामु गुरुदासानी, विजय खरे, सिद्धेश्वर ठेंग, बद्री पानगोळी, सचिन कोकाटे, कैलास घाडगे, सुरेश जाधव, सुरेश बाहेकर, कैलास जाधव, शैलेश सोनोने, विलास पडघान, गोपाल शेळके, सुरेश वाळेकर, सादिक काझी, उद्धवराव पवार , रमेश सोळंकी, योगेश राजपूत, चेतन देशमुख सौ. शारदा पवार, सचिन गरड, नारायण गरड, ऋषी इंगळे, आकाश जाधव, दत्ता खंडेलवाल, शंकर रुद्रकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.