औरंगाबादेत महिला ठरली दिराच्या अत्याचाराचा बळी

औरंगाबाद : पतीसोबत भांडण झाल्याने माहेरी गेलेल्या पत्नीला पतीसोबतचे तुझे भांडण मिटवून समझोता करून देतो असे म्हणून दिरानेच फसविले. जुन्या ओळखीचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादेत घडली आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीस अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याची रवानगी चार दिवसांच्या कोठडीत केली आहे. औरंगाबादेतील मुकुंदवाडीत राहणार्या एका ३५ वर्षीय …
 

औरंगाबाद : पतीसोबत भांडण झाल्याने माहेरी गेलेल्या पत्नीला पतीसोबतचे तुझे भांडण मिटवून समझोता करून देतो असे म्हणून दिरानेच फसविले. जुन्या ओळखीचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादेत घडली आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीस अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याची रवानगी चार दिवसांच्या कोठडीत केली आहे. औरंगाबादेतील मुकुंदवाडीत राहणार्‍या एका ३५ वर्षीय इसमाची पीडितेशी ओळख होती. पतीसोबत भांडण झाल्याने सदर महिला तिच्या माहेरी राहण्यासाठी गेली होती व ती त्याच्यापासून फारकत घेणार होती.त्यावेळी आरोपीने तुझे व तुझ्या पतीचे भांडण मिटवून देतो असे म्हणून तिला औरंगाबादला आणले. तो व्यक्ती तिचा दीर लागत असल्याने ती त्याच्यासोबत आली. ४ ऑक्टोबर रोजी त्याने तिला एका खोलीवर ठेवून तिच्यासोबत अनेकदा अत्याचार केला.तसेच जीवे मारण्याची व बदनामीची धमकी देऊन तिला गप्प राहण्यास बजावले.पण तिने त्याची तक्रार ठाण्यात दिल्यावर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.