कंटेनरने काळीपिवळीला अक्षरशः चिरडले; पती-पत्नीसह तिघे जागीच ठार; 9 प्रवासी जखमी, नांदुरा – वडनेर मार्गावरील भीषण अपघात

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव कंटेनर आणि काळीपिवळीत झालेल्या भीषण अपघातात पती – पत्नीसह तिघे जण जागीच ठार तर 9 प्रवासी जखमी झाले. अंगावर शहारे आणणारी ही घटना आज, 24 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नांदुरा – वडनेर मार्गावरील वडी गावानजिक घडली. काळी पिवळी (क्रमांक एमएच …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव कंटेनर आणि काळीपिवळीत झालेल्या भीषण अपघातात पती – पत्नीसह तिघे जण जागीच ठार तर 9 प्रवासी जखमी झाले. अंगावर शहारे आणणारी ही घटना आज, 24 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नांदुरा – वडनेर मार्गावरील वडी गावानजिक घडली.


काळी पिवळी (क्रमांक एमएच 28 बी 9329) नांदुराकडून मलकापूरकडे प्रवासी घेऊन जात असताना वडनेर कडून नांदुराकडे भरधाव येत असलेल्या कंटेनरच्या (क्रमांक आर जे 10 जीए 7599) चालकाने वडनेरनजीक काळी पिवळीला जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात काळी पिवळीमध्ये बसलेले प्रवासी सुनिल सुभाष तायडे, सौ. अर्चना सुनिल तायडे (रा. वडनेर) हे दोघे पती – पत्नी व भगीरथाबाई विठ्ठल दळवी (रा. वडनेर) या तिघांचा गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला. तर सौ. आशा पुुंडलिक जंगले (रा. काटी), सौ. जय अनंतराव जंगले (रा. काटी), रामचंद नथ्थू सातव (रा. वडनेर), सौ. पुष्पा गजानन इंगळे (रा. वडनेर), कु. श्रेया सुनिल तायडे, कु. तनिष्का रमेश होनाडे, रियांश सुनिल तायडे, सौ. कमल दिनकर पांडे, सौ. बेबाबाई राजाराम सातव (रा. वडनेर) हे 9 प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच ओमसाई फाऊंडेशनच्या कार्यकर्ते विलास निंबोळकर, पत्रकार प्रविण डवंगे, आनंद वावगे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. पुढील उपचाराकरिता खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान अपघात स्थळावरून कंटेनर चालकाने कंटेनर घेऊन पळ काढला होता. त्याला नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे नांदुरा शहरात पकडण्यात आले. याप्रकरणी कंटेनर चालक जिवन नलबतसिंग मालवी (32, रा.निपानी खुर्द जि.साजापूर राज्य मध्यप्रदेश) याला नांदुरा पोलिसांनी अटक केली आहे.