कंटेनरने १२ वर्षीय मुलाला चिरडले; दुचाकीला धडक, आई-वडीलही जखमी, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कंटेनरने दुचाकीला धडकेत १२ वर्षीय मुलगा चिरडला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे आई- वडील जखमी झाले आहे. ही घटना काल, ५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ च्या सुमारास खामगाव -नांदुरा मार्गावरील मराठा हॉटेलजवळ घडली. सोहम राजेश तायडे (रा. नांदुरा, ह.मु. जनुना, ता. खामगाव) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव …
 
कंटेनरने १२ वर्षीय मुलाला चिरडले; दुचाकीला धडक, आई-वडीलही जखमी, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कंटेनरने दुचाकीला धडकेत १२ वर्षीय मुलगा चिरडला गेला. त्‍याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे आई- वडील जखमी झाले आहे. ही घटना काल, ५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ च्या सुमारास खामगाव -नांदुरा मार्गावरील मराठा हॉटेलजवळ घडली.

सोहम राजेश तायडे (रा. नांदुरा, ह.मु. जनुना, ता. खामगाव) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. सोहम आईवडिलांसह नांदुरा येथे दुचाकीने जात होता. खामगावकडून येणाऱ्या कंटेनरने (क्र. एमएच ४० बीएल ७९८०) दुचाकीला मागून धडक दिली. यात सोहम कंटेनरच्या चाकाखाली आल्याने चिरडला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खामगावच्‍या शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळावरून पसार झालेल्या ट्रकला पोलिसांनी नांदुऱ्याजवळ पकडले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.